ठाणे जि.प.च्या सेवानिवृत्तांचे विविध मागण्यांसाठी सीईओना साकडे!
By सुरेश लोखंडे | Published: April 13, 2023 05:19 PM2023-04-13T17:19:14+5:302023-04-13T17:19:39+5:30
समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या या कर्मचार्यांनी आता एकत्र येत पेन्शनर्स वेल्फेअर असोशिएशनची स्थापना करून त्याव्दारे महिला व पुरूषांनी संघर्ष सुरू केला आहे.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या सेवा निवृत्त कर्मचार्यांना त्यांच्या विविध लाभांसाठी सतत फेर्या माराव्या लागत आहेत. सेवा निवृत्तीच्या रकमांसह आवश्यक लाभ मिळत नसल्यामुळे या सेवा निवृत्त कर्मचार्यांनी आज एकत्र येत मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या कथन केल्या.
समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या या कर्मचार्यांनी आता एकत्र येत पेन्शनर्स वेल्फेअर असोशिएशनची स्थापना करून त्याव्दारे महिला व पुरूषांनी संघर्ष सुरू केला आहे. बहुतांशी रकमाही थकीत आहेत. तर काहींना सततच्या फेर्या मारूनही सेवा निवृत्तीची रक्कम मिळालेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. आज या सर्व महिला, पुरूषांनी एकत्र येत सीईओ यांना सेवानिवृत्तीच्या विविध समस्या ऐकवल्या आहेत. यासाठीही त्यांना दीर्घवेळ सीईओ यांच्या दालनासमाेर बसावे लागले. त्यांनंतरही संबंधीत अधिकारी उपस्थित नसल्याचेही यावेळी ऐकाला मिळाले. त्यामुळे या सेवानिवृत्त कर्मचार्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी पेन्शनर्स वेल्फेअर असोशिएशन चे अध्यक्ष राजेंद्र जगे, सचिव रामचंद्र मडके आदींसह जेष्ठ पदाधिकारी वा सेवानिवृत्त सदस्य माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.