ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी ठरले "आयर्न मॅन" अर्थात 'लोहपुरुष'

By सुरेश लोखंडे | Published: September 12, 2023 11:31 PM2023-09-12T23:31:44+5:302023-09-12T23:32:58+5:30

ही स्पर्धा रविवारी कोल्हापूर येथे पार पडली होती.

Thane District Supply Officer became Iron Man | ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी ठरले "आयर्न मॅन" अर्थात 'लोहपुरुष'

ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी ठरले "आयर्न मॅन" अर्थात 'लोहपुरुष'

googlenewsNext

ठाणे :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांना आधीपासून व्यायामाची आवड आहे. कोल्हापूर येथील डेक्कन स्पोर्टस् क्लब तर्फे आयोजित लोहपुरूष 'ट्रायथलॉन' या स्पर्धेत त्यांनी  इतर ९९ स्पर्धकांना पिछाडीवर टाकत विविध तीन टप्यातील ही स्पर्धा अलिकडेच जिंकली. त्यामुळे ते आता आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” म्हणून ओळखले जाणार असल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केले. ही स्पर्धा रविवारी कोल्हापूर येथे पार पडली होती.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गजरे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २००७ ची सरळसेवा परीक्षा दिल्यानंतर ते त्यात यशस्वी झाले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले गजरे आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. व्यायमाची आवड गजरे यांना स्वस्थ बसू देत नाही. दरम्यान कोल्हापूर येथील या तीन टप्यातील स्पर्धेत मोठ्या जिद्दीने उतरलेले गजरे यशस्वी 'आयर्न मँन' ठरले. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात स्पर्धकांना कोल्हापूरच्या प्रसिध्द राजाराम तलावात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लगेचच कोल्हापूर-बॅंगलोर महामार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ३.२१ किलोमीटर (अर्ध मॅरेथॉन) पूर्ण करणे आवश्यक होते.
        
स्पर्धा पूर्ण करण्यासाठी निर्धारीत वेळ १० तास इतकी होती. स्पर्धा सकाळी ६.३० वाजता सुरू झाली आणि . गजरे यांनी दुपारी २.५५ वाजता ही स्पर्धा पूर्ण केली. अवघ्या ८ तास २५ मिनिटात गजरे यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या जिंकली. अन् त्यांनी पटकाविला “आयर्न मॅन” अर्थात “लोहपुरुष” किताब..! यापूर्वी ही ९० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण करणे, ही अट असलेली जगातील सर्वात कठीण व जुनी मॅरेथॉन ऑगस्ट २०२२ मध्ये गजरे यांनी पू्र्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि त्यात ते यशस्वी ही झाले. 

या स्पर्धेला जिंकण्यासाठी त्यांनी रोज सकाळी ५ ते ७ वाजे दरम्यानचा किमान २ तासाचा वेळ दिला. यामध्ये त्यांनी सायकल चालविणे, पोहणे व धावणे या तिन्ही खेळांचा सातत्याने सराव केला. यासोबतच खाण्यापिणाच्या सवयींवर बारकाईने लक्ष दिले. लवकर झोपणे लवकर उठणे, हा मंत्र त्यांनी कटाक्षाने प्रत्यक्ष कृतीत आणला. या यशाबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी गजरे यांनी इतरांबरोबरच विशेष करुन शासकीय अधिकाऱ्यांसाठी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचा संदेश दिला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी व्यायामासाठी वेळ जरुर काढावा, असे आवाहन त्यांनी अधिकारी वर्गाला केले आहे.ते ठाणे येथे गेल्या १ जूनपासून जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून आज रोजी सक्रीय आहे.
 

Web Title: Thane District Supply Officer became Iron Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे