ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू, दिवाळीतील लाडू होणार कडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 07:12 PM2017-10-03T19:12:52+5:302017-10-03T19:13:48+5:30

जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-यांच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले.

Thane District Supply Workers' Unlawful Work-Started Movement, Diwali laddo will be bitter | ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू, दिवाळीतील लाडू होणार कडू 

ठाणे जिल्हा पुरवठा कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू, दिवाळीतील लाडू होणार कडू 

Next

ठाणे - जिल्हा व तालुका पुरवठा कर्मचा-याच्या सुमारे २०१० पासून आश्वासन दिलेल्या मागण्या अद्याप ही मंजूर केल्या नाही. सतत पाठपुरावा करून संतापलेल्या या कर्मचार्यांनी अखेर मंगळवारी सकाळपासून राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या आंदोलनामुळे  ठाणे जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर सणासुदीच्या अन्नधान्यांसह साखर, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार नाही. यामुळे दिवाळीचा लाडू मात्र कडू होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
    या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील सुमारे २००कर्मचा-यांचा  समावेश असल्याचे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस प्रशांत  कापडे यांनी लोकमतला सांगितले. या कामबंद आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास दिवाळी सणानिमित्त जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागातील सुमारे 593 शिधावाटप दुकानांवर सणासुदीचे अन्नधान्य, गोडे तेल, साखर, डाळी आदींचा पुरवठा अजिबात होणार नाही. परिणामी सुमारे लाखो ग्रामस्थ, आदिवासी कुटुंबिये दिवाळीत लाडू सारख्या गोडधोड  पदार्थापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
     जिल्हास्तरीय पुरवठा विभागाचे वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीच्या कर्मचार्यांनी या आदोलनात सहभाग घेतला. बेमुदत कामबंद आंदोलनादरम्यान कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही. त्यांच्या या असहकारमुळे ग्रामीण कुटुंबियाना जीवनावश्यक  वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक कर्मचार्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. जिल्हा पुरवठा विभागासह तहसीलदारांच्या नियंत्रणातील पुरवठा कर्मचारी या आंदोलनात आहेत. 
    या आंदोलनापाठोपाठ १० ऑक्टोबरपासून महसूल कर्मचारी देखील बेमुदत आंदोलन छेडणार आहे. ऐन दिवाळीत राज्यभर होणाऱ्या या आंदोलनादरम्यान अन्नधान्याच्या पुरवठा व शासकीय कामांना खीळ बसणार आहे. आश्वासन देऊनही कर्मचा-यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून संतापलेल्या कर्मचा-यांनी या बेमुदत व असहकार आंदोलनाचा पवित्र घेतल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय उपाध्यक्ष भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.

Web Title: Thane District Supply Workers' Unlawful Work-Started Movement, Diwali laddo will be bitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे