ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीची आता ‘मृदा आरोग्यपत्रिका’ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:32 AM2019-08-12T02:32:03+5:302019-08-12T02:32:20+5:30

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ तयार करून मिळणार आहे.

Thane district will now get 'Soil Health Paper' of farmland | ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीची आता ‘मृदा आरोग्यपत्रिका’ मिळणार

ठाणे जिल्ह्यात शेतजमिनीची आता ‘मृदा आरोग्यपत्रिका’ मिळणार

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ तयार करून मिळणार आहे. तत्पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक गाव व त्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ या वर्षापासून तयार केली जाणार आहे. यासाठी पाच तालुक्यांतील पाच गावांची निवड लवकरच कृषी विभागाकडून होणार आहे.

शेतजमिनीत अधिकाधिक उत्पन्न घेता यावे, यासाठी कृषी विभागासह कृषीतज्ज्ञांद्वारे विविध उपाययोजना व शास्त्रोक्त पद्धती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यास अनुसरून शेतजमिनीत योग्य पीकलागवड व पिकासाठी योग्य खत आदींची जाणीव करून देण्यासाठी आता शेतजमिनीचे शास्त्रोक्त परीक्षण कृषीतज्ज्ञाद्वारे केले जात आहे.

जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बदलत्या हवामानास अनुसरून शेतजमिनीचा अभ्यास केला जाणार आहे. जमिनीचा प्रकार व त्यात कोणते पीक घेणे शक्य आहे, त्या पिकास कोणत्या खताची व कोणत्या कालावधीत गरज आहे. खरीप पिकास व रब्बीच्या पिकाच्या उत्पादनासाठी जमिनीचा कस कसा आहे, आदी सिद्ध करणारी ‘मृदा आरोग्यपत्रिका’ शास्त्रोक्त व अभ्यासपूर्ण तयार केली जात आहे.

जिल्ह्यात मृदा आरोग्यपत्रिका वितरण अभियान पथदर्शी कार्यक्र म राबवण्याच्या दृष्टीने यंत्रणा सतर्क झाली आहे. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषी शास्त्रज्ञ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी मनोज ढगे इत्यादी प्रमुख कृषीतज्ज्ञांची मंगळवारी खास बैठक घेऊन जिल्ह्यातील शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ उपक्रम जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निश्चित केले. या अभियानाच्या यशस्वितेसाठी कृषी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे.
यासाठी शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांमधील केवळ पाच गावे निवडली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड होईल. या पाच तालुक्यांच्या पाच गावांतील खातेदार असलेल्या एक हजार ७५० शेतकºयांच्या शेतजमिनीची ‘मृदा आरोग्यपत्रिका’ तयार केली जाणार आहे.
या पत्रिकेचे शेतकºयांना वाटप होईपर्यंत आणि त्यातून मिळालेल्या आउटपूटच्या अनुभवावर सर्व शेतकºयांच्या शेतजमिनीची मृदा आरोग्यपत्रिका’ खास अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली जाणार आहे.
जिल्ह्यात याआधी २०१५ व १६ या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एक लाख १४ हजार शेतकºयांना त्यांच्या शेतजमिनीची मृदा आरोग्यपत्रिका दिलेली आहे. त्यानंतर, आता पुन्हा बदलत्या हवामानाचा शेतीजमिनीवर होणारा परिणाम, जमिनीनुसार शेतीचा पोत व प्रकार आणि त्यावर अवलंबून पीकलागवडीच्या दृष्टीने मृदा आरोग्यपत्रिका तयार करण्याचे काम या वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाले आहे.
तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या अभ्यासपूर्ण संशोधनातून शेतीची मृदा आरोग्यपत्रिका तयार होईल. त्यानुसार, शेतकºयांना पीकलागवड व पीकनिगा करणे सोयीचे होईल आणि कृषी उत्पादन वाढेल.

निवडलेली गावे ही पुढीलप्रमाणे

घोटसई, ता. कल्याण-४१७ मृद आरोग्यपत्रिका कुडसावरे,
ता. उल्हासनगर-२९० पत्रिका
लेनाड बु. ता. शहापूर -३३०,
इंदे, ता. मुरबाड -३८१,
पिसे, ता. भिवंडी -३३३.

Web Title: Thane district will now get 'Soil Health Paper' of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे