उल्लेखनीय कामकाजामुळे ठाणे जिल्हा महिला, बालविकासला राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्कार’
By सुरेश लोखंडे | Published: November 26, 2023 06:10 PM2023-11-26T18:10:18+5:302023-11-26T18:11:29+5:30
‘बालस्नेही पुरस्कार’पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.
ठाणे : उल्लेखनीय कामकाज केल्यामुळे यंदाच्या प्रथम वर्षी ‘बाल स्नेही पुरस्कार देउन ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड व सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यंदा प्रथमच हा राज्यस्तरीय पुरस्कार उत्कृष्ट कार्याबद्दल प्रधान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ, होप फॉर चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने २०२३ पासून दिल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय पहिल्या ‘बालस्नेही पुरस्कार’चे मानकरी ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभाग ठरला आहे. यासह अन्यही जिल्ह्यांचा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. या अत्यंत प्रतिष्ठेचा बाल स्नेही पुरस्काराचे वितरण महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीला बेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील जिल्हा कार्यालयाने अंपग मुलांचे बालगृह उल्हासनगर येथे फिजोथेरेपी, कॉम्प्युटर लॅब, मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी राज्यात प्रथमच हा यशस्वी प्रयत्न उल्हासनगरने केला आहे. याशिवाय जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना ठाणे संचालित मुलामुलींचे बालगृह निरिक्षण गृह भिवंडी येथेही कॉम्प्युटर लॅब, मुलींना शिलाई मशिन प्रशिक्षण, योगासन, व्यसनमुक्ती पुर्नवसन, संस्कारवर्ग, यांसारखे पुर्नवसनाचे उपक्रम राबवून मुलांना समाजात ताठ मानने उभे राहण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील आहे.
ठाणे जिल्हयातंर्गत रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी फिरते पथक स्थापन करुन १५५ मुलांना शाळेत दाखल करून त्यांचे पुर्नवसन करण्यात आले आहे. बाल संगोपन योजनातंर्गत दाेन हजार ८८ मुलांना लाभ देण्यात आला आहे. बालसंरक्षण, बालविवाह मुक्ती, बाल तस्करी रोख काम, बालकामगारांची कामातून मुक्तता, बालगृहातील सुधारणा, बालगृहामधील अपंग मुलांचे पुर्नवसन अशी उल्लेखनीय कामगिरी या ठाणे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने बजावली आहे. त्यांनी केलेल्या या संपूर्ण कार्याची दखल महिला बालविकास आयुक्तालय, बाल हक्क संरक्षण आयोग व युनिसेफ सारख्या संस्थांनी आर्वजून दखल घेतली आहे. कामकाज यशस्वीपणाने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे वरील सर्व कामे अत्यंत उत्कृष्टपणाने महिला बाल विकास अधिकारी कार्यालयास पाड पाडता आली. आयुक्त डॉ, प्रशांत नारनवरे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे विशेष अभिनंदन करुन सत्कार करण्याबाबत सूचित केले, अशी माहिती ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.