ठाणे जि.प.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांसह काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा निधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 07:54 PM2018-11-19T19:54:33+5:302018-11-19T20:06:40+5:30

इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास सावरण्याचा प्रयत्न या सर्वसाधारण सभेच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून त्वरीत चौकशीचे आदेश जारी केले. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये आज हीसर्वसाधारण सभा झाली.

Thane district's corruption cover; That - the funds for the repair of the road that was working along the road works. | ठाणे जि.प.चा भ्रष्टाचार चव्हाट्यावर; त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांसह काम सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा निधी !

रस्त्यांची कामे झालेली असतानाही त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्याची मनमानी

Next
ठळक मुद्देपावणेतीन कोटींचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७० लाखांच्या निधीच्या मंजुरीचा प्रस्तावशहापूर तालुक्यातील दोन म्हशान भूमीचे कामे न करताच निधी हडप केला, तीन अंगणवाड्या न बांधताच बिल काढण्यात आलीमुरबाडमध्येही काम झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा घेण्यात आल्याचे सदस्य सुभाष घरत यांनीही निदर्शनात आणून दिले

ठाणे : शहापूर तालुक्यातील दोन म्हशान भूमीचे कामे न करताच निधी हडप केला, तीन अंगणवाड्या न बांधताच बिल काढण्यात आली आदीं भ्रष्टाचारासह रस्त्यांची कामे झालेली असतानाही त्यास - त्यास रस्त्यांच्या कामांना मंजुरी घेण्याची मनमानी आणि भिवंडी तालुक्यातील केवणी दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असतानाच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७० लाखांच्या निधीच्या मंजुरीचा प्रस्ताव सोमवारी ठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य देवेश पाटील यांनी उघड करून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून जि.पचे पितळ उघडे पाडले.
इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय असताना थेट कामांची यादी मंजूर झाल्याचा उल्लेख कसा, असा सवाल पाटील यांनी करून दिवे-पुर्णा रस्त्याचे पावणेतीन कोटींचे काम सुरू असताना त्याच्या दुरूस्तीसाठी ७० लाखांचा निधी निदर्शनात आणून देताच सभागृहात एकच खळबळ उडाली. त्यास सावरण्याचा प्रयत्न या सर्वसाधारण सभेच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून त्वरीत चौकशीचे आदेश जारी केले. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये आज हीसर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती, मुख्यकार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदींसह जिल्हा प्रकल्प अधिकारी रूपाली सातपुते आदींची व्यासपीठावर उपस्थित होते.
 इतिवृत्त मंजुरीच्या विषयावर बोलताना देवेश पाटील म्हणाले की गेल्या वेळी सभेत बांधकाम विभागाची कामे मंजूर करण्याचा विषय होता. मात्र, आता थेट कामांची यादी मंजूर कशी झाली, असा सवाल त्यांनी केला. पण सदस्यांच्या लेखी सुचनेवरून कामे घेतल्याचा खुलासा बांधकाम कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. केवणीदिवे - पुर्णा रस्त्याचे दोन कोटी ७५ लाख रु पयांचे काम सुरू असताना या रस्त्यासाठी जिल्हा परिषदेने चक्क ७५ लाख रु पयांची दुरूस्ती करणार असल्याचे जाहीर केल्याचे देवेश पाटील यांनी यावेळी उघकीस करून सभागृहात खळबळ उडवली. एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा रस्ते तयार करण्यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या कामांना स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. गेल्या वर्षाचीच रस्तयांची कामेची कामे अद्यापी सुरू असतानाच, नव्याने कामे देण्याची घाई का, यावर अधिकाऱ्यांसह सीईओ, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे आदींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न यावेळी केला. मात्र, काही रस्त्यांच्या कामांना अद्यापी कार्यादेश दिला नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मान्य केले.
भिवंडी तालुक्यातील सदस्यांकडून मागणी नसतानाही रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. कल्याण ग्रामीण, शहापूर वा मुरबाड तालुक्यातील रस्त्यांसाठी हा निधी वापरता आला असता, याकडे देवेश पाटील यांनी लक्ष वेधले. तर मुरबाडमध्येही काम झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा घेण्यात आल्याचे सदस्य सुभाष घरत यांनीही निदर्शनात आणून दिले. तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या शहापूर तालुक्यात दोन म्हशान भूमीच्या कामांच्या निधींसह तीन अंगणवाडी केंद्रांचे बांधकामे झालेले नसतानाही संबंधीत ग्रासेवकाने कामांचे बील काढून घेतल्याचे सदस्यांने या वेळी सभागृहत उडघ केले. एकाच रस्त्याची दोन वेळा कामे करण्याच्या प्रकरणांची चौकशीचे आदेश अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडून चौकशी केली जाईल. तसेच तयार केलेल्या प्रस्तावांचा नव्याने आढावा घेतला जाईल, असे सीईओ यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Thane district's corruption cover; That - the funds for the repair of the road that was working along the road works.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.