SSC Result: ठाणे जिल्ह्याचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला; यंदाही मुलींनीच मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 03:15 PM2020-07-29T15:15:11+5:302020-07-29T15:29:38+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला.
ठाणे : मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालात ठाणो जिल्ह्याचा निकाल 96.61 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणो यंदाही जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली असून मुलींचा निकाल 97.67 टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा 18 टक्क्यांनी वाढला आहे. जिल्ह्याचा निकाल गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत सवरेत्तम लागल्याने शैक्षणिक वतरुळात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. या निकालात ठाणे जिल्ह्यानेही चांगली छाप पाडली आहे. यंदा जिल्ह्यातील 1235 शाळांतून 107830 विद्याथ्र्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 107546 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 103900 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 37469 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. 37875 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 22368 विद्याथ्र्याना द्वितीय श्रेणी तर 6188 विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे.
जिल्ह्यातून खाजगीरित्या 9810 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 9646 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 7099 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल 73.60 टक्के लागला आहे. तर जिल्ह्यातील रिपीटर्सचा निकाल 73.16 टक्के लागला आहे. परीक्षा दिलेल्या 19233 पैकी 14070 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.