केंद्राच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:38 PM2019-06-03T20:38:37+5:302019-06-03T20:42:51+5:30
हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये
ठाणे : यंदा फलश्रुती म्हणून यंदा केंद्राच्या पेयजल स्वच्छता विभागाने स्वच्छते बाबत केलेल्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात ठाणे जिल्ह्याचा राज्यात अव्वल तर देशात १२५ क्र मांक प्राप्त झाला असल्याची माहिती स्वच्छता व पाणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विविध निकषांनुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने काम केले. यामध्ये हागणदारीमुक्त ग्राम पंचायत, स्वच्छतेबाबत लोकांची जाणीव जागृती, स्वच्छतेशी निगडीत प्रशिक्षण पूर्ण करणे , नादुरूस्त शौचालय दुरु स्त करणे, सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे, सामुहिक स्तरावर कंपोस्ट पीट, शोषखड्डे फोटो अपलोडिंग पूर्ण करणे, ओडीए कक्ष स्थापन करणे, जिल्हा प्रशिक्षण गटांची स्थापना करणे आदी सर्व कामामध्ये जिल्ह्याने तत्परता दाखवली. यामुळे भरीव कामकाजामुळे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता दर्पण’ मूल्यांकनात राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.
मागील दोन वर्षापूर्वी पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर देखिल जिल्ह्यात स्वच्छता नांदावी यासाठी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्र म हाती घेतले जात आहेत. जिल्हा परिषदेने केलेल्या कामिगरी बद्दल संपूर्ण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी अभिनंदन केले. जिल्हा परिषदेव्दारे जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ-सुंदर राहावा यासाठी जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग दरवर्षी विविध उपक्रम हाती घेतले जात आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना जलद गतीने जिल्ह्यात राबवणे सहज शक्य होत असल्यामुळे यंदाही राज्यात जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला आहे.