ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:40 AM2019-09-19T05:40:59+5:302019-09-19T05:41:03+5:30

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे.

Thane-Diva road closure 'local detour' | ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

ठाणे-दिवा मार्गिका रखडल्याने ‘लोकल खोळंबा’

googlenewsNext

मुंबई : ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचा दररोज लोकल खोळंबा होत आहे. ठाणे स्थानकावर मध्य, ट्रान्स हार्बर हे मार्ग जोडले आहेत. यासह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबा घेतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र रेल्वेकडून अपुऱ्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जातात. या स्थानकादरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावते. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जातो.
ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका बनल्यास मेल, एक्स्प्रेससाठी विशेष मार्गिका तयार होईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आलेला ताण कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल, असा आशावाद मध्य रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मुंबईतील खासदार आणि रेल्वे अधिकारी यांची याबाबत नुकतीच बैठक झाली. यामध्ये ठाणे ते दिवा, कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याची चर्चा या बैठकीत झाली.
>ऐतिहासिक स्थानक दुर्लक्षित
मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. त्यामुळे मुंबई ते ठाणे या मार्गाला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सीएसएमटी स्थानकाला जागतिक दर्जा आहे. मात्र ठाणे स्थानक ऐतिहासिकदृष्ट्या मागे आहे. त्यामुळे या स्थानकाचे नूतनीकरण, मार्ग वाढविण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

Web Title: Thane-Diva road closure 'local detour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.