खेलो इंडीया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे, डोंबिवलीची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:03 PM2018-02-07T23:03:49+5:302018-02-07T23:04:02+5:30

खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या ८ व्या दिवशी जिम्नॅस्टीक मध्ये आज महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली यात महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रजत  व ४ कास्य पदक मिळाली.

Thane, Dombivli perform well in the gymnastics in India's Gymnastics | खेलो इंडीया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे, डोंबिवलीची दमदार कामगिरी

खेलो इंडीया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे, डोंबिवलीची दमदार कामगिरी

Next

नवी दिल्ली - खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या ८ व्या दिवशी जिम्नॅस्टीक मध्ये आज महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली यात महाराष्ट्राला २ सुवर्ण, १ रजत  व ४ कास्य पदक मिळाली. ठाणे येथील डीएव्ही पब्लीक स्कुलची पूर्वा किर्वे हिने अनइव बार्स आर्टीस्टीक जिम्नॅस्टीक प्रकारात ८.७० गुणांसह सुवर्ण पदक मिळविले तसेच पूर्वाने फ्लोर आर्टिस्टी जिम्नॅस्टीक प्रकारात कास्य पदकही पटकविले.

 पोमेल जिम्नॅस्टीक प्रकारात मुंबई डोंबिवली येथील विद्यामंदीर शाळेचा मनेश गाढवे याने ११ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकविले.  

जिम्नॅस्टीकमध्ये वैयक्तिक ऑल राऊंड रिदमिक प्रकारात ठाणे येथील हिरानंदानी फाऊंडेशन स्कुलच्या प्रियंका आचार्य हीने ३९.२५ गुणांसह कास्य पदक पटकविले. क्रीडा प्रबोधनी महाळुंगे पुणे येथील एश्वर्या बेलदार हीने टेबल वाल्ट आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक प्रकारात कांस्य पदक पटकावले. मुंबई येथील डी.जी.रूपारेल महाविद्यालयाच्या आदित्य फडणीस याने रिंग्स जिम्नॅस्टीक प्रकारात कास्य पदक मिळवले.

Web Title: Thane, Dombivli perform well in the gymnastics in India's Gymnastics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा