Thane: बालकामगारांच्या ठिकाणांची रेकी करून हाेणार धडक कारवाई

By सुरेश लोखंडे | Published: August 26, 2023 07:39 PM2023-08-26T19:39:17+5:302023-08-26T19:39:28+5:30

Thane: ठाणे जिल्ह्यात बालकामगारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणांच्या जागांची आधी पाहाणी करून संबंधी स्थळे आयडेंटीफाय करा आणि त्यानंतर संयुक्तरित्या धडक कारवाई करा, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी प्रशासनास जारी केले आहे.

Thane: Draconian action will be taken by raiding the places of child labourers | Thane: बालकामगारांच्या ठिकाणांची रेकी करून हाेणार धडक कारवाई

Thane: बालकामगारांच्या ठिकाणांची रेकी करून हाेणार धडक कारवाई

googlenewsNext

ठाणे - जिल्ह्यात बालकामगारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणांच्या जागांची आधी पाहाणी करून संबंधी स्थळे आयडेंटीफाय करा आणि त्यानंतर संयुक्तरित्या धडक कारवाई करा, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी प्रशासनास जारी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बालकामगार प्रतिबंध जिल्हा समितीची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी बालकामगार प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांसह पाेलीस अधीकारी, महिला बालविकास अधिकारी आदींच्या उपस्थिती जिल्हाधिकार्याच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडल्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी सांगितले. त्यात सर्व विभागांनी संयुक्तरित्या कारवाई करून जिल्ह्यातील बालकामगारास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कल्याण, डाेंबिवली, भिवंडी आदी ठिकाणी बालकांकडून माेठ्याप्रमाणात काम करून घेतल्या जात असल्याचे गायकवाड यांनी लक्षात आणून दिले. या शहरांसह अन्यही ठिकाणांची कारवाईपूवीर् पाहाणी करून सर्व विभागानी एकत्र येऊन धडक कारवाई करवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिल्याचा दुजाेरा गायकवाड यांनी दिला आहे. त्यानुसार लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन संबंधीत दुकानदार, कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्यासह दंडही करण्यात येणार आहे. कारवाईत सापडलेल्या बालकांना त्यांच्या आईवडीलांकडे सुपुर्द करण्यात येईल. काही बालकांचे पुनर्वसन हाेईल,असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Web Title: Thane: Draconian action will be taken by raiding the places of child labourers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे