उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यात नरेश म्हस्केंचा पुढाकार- राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 05:21 PM2022-08-02T17:21:28+5:302022-08-02T17:23:49+5:30

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मांडलं रोखठोक मत

Thane Ex Mayor Naresh Mhaske backstabbed Shiv Sena Uddhav Thackeray blames NCP Anand Paranjpe | उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यात नरेश म्हस्केंचा पुढाकार- राष्ट्रवादीचे टीकास्त्र

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्यात नरेश म्हस्केंचा पुढाकार- राष्ट्रवादीचे टीकास्त्र

googlenewsNext

राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, असे विधान नरेश म्हस्के यांनी केले होते. याबाबत राष्ट्रवादीचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. "नरेश म्हस्के यांनी स्वतःचा इतिहास तपासून घ्यावा. मला त्यावर अधिक बोलायचे नाही. ज्यांनी स्वतः वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला अन् शिवसेनेचा वेगळा शिंदे गट स्थापन करण्यात ज्यांचा पुढाकार ठाणेकरांनी पाहिला, त्यावर न बोललेले बरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली खंबीर आणि भक्कम आहे. त्याची प्रचिती कालच आली. राज्यपाल कोश्यारींविरोधात केलेल्या आंदोलनानंतर कोश्यारी यांना माफी मागावी लागली. त्यामुळे म्हस्के यांनी स्वतःकडे बघावे की आपण कोणत्या गटात, कोणत्या ताटात की कोणत्या गटारात आहोत", असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाणे महानगर पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींसोबत पत्रकारांना संबोधित करत होते. याबाबत विचारले असता आनंद परांजपे म्हणाले की, ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना आपल्या प्रशासकीय कर्तव्यांची आठवणच राहिलेली नाही. महासभेची मुदत ९ मार्चला संपलेली आहे. त्यामुळे ठामपातील १३१ नगरसेवक हे सामान्य ठाणेकर झालेले आहेत. कोणी महापौर नाही, कोणी उपमहापौर नाही, कोणी स्थायी समिती सभापती नाही किंवा कोणीही सभागृहनेता नाही. ही पदे आता अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे डॉ. विपीन शर्मा हे स्वतः पालिकेचे प्रशासक आहेत. त्यांनी जरूर ठाणे शहराचे दौरे करावेत, विकासकामांची माहिती प्रसारमाध्यांमातून ठाणेकरांना द्यावी. पण, ज्या महासभेचे अस्तित्व संपलेले आहे, अशा महापौरांना सोबत घेऊन आयुक्त सातत्याने कायद्याचे उल्लंघन करत आहेत. त्याबाबतची लेखी तक्रार मुख्य सचिवांकडे आपण करणार आहोत. शिवाय, माजी आयुक्तांना विनंती आहे की कायदा तोडणारे आयुक्त असे चित्र ठाणेकरांसमोर उभे करू नका. 

जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गडकरी रंगायतनमध्ये गुणवंतांचा सत्कार आणि करियर मार्गदर्शन तर मुंब्रा येथे दाखले वाटप शिबिर घेण्यात येणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी आव्हाडांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरविले आहे. वाढदिवसानिमित्त ५ व  ६ ऑगस्ट रोजी कौसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच परिवहन सदस्य शमीम खान यांच्या वतीने दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.

Web Title: Thane Ex Mayor Naresh Mhaske backstabbed Shiv Sena Uddhav Thackeray blames NCP Anand Paranjpe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.