Thane: जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी
By कुमार बडदे | Updated: August 19, 2023 22:31 IST2023-08-19T22:30:08+5:302023-08-19T22:31:51+5:30
Thane News: दोन धर्मात कथीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

Thane: जिंतेद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची मागणी
- कुमार बडदे
मुंब्रा - दोन धर्मात कथीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाने निवेदनाच्या माध्यमातून शिळ- डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसा निरीक्षक सचिन गावडे यांच्याकडे केली आहे.
मुंब्र्यातील मुंम्ब्रेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे नुकताच शंकर मंदिर पासून कल्याणफाटा-डोंबिवली रस्त्या जवळील खिडकाळी महादेव मंदिर पर्यंत कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेमध्ये हिंदू धर्माचे भक्त संस्कृतीनुसार नाचत- भजन करीत होते. परंतु आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मशिदी समोरचा व्हिडिओ काढून. त्यांच्या ट्विटर अकाउंट वर व्हायर करून. हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.दरम्यान हे कृत्य करणारे तसेच त्यांच्या पाठिशी असणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणी आव्हाड यांनी केली सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे.