ठाण्यात आढळला ओमायक्रोनचा पहिला रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 01:45 AM2021-12-24T01:45:06+5:302021-12-24T01:45:45+5:30
सध्या या रुग्णाला महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत अखेर ओमायक्रोनचा पहिला रुग्ण आढळला आहे. ४० वर्षीय नागरिकाला ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा नागरिक १४ डिसेंबर रोजी घाणा येथून ठाण्यात आला होता. यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने १६ तारखेला त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला महापालिकेने रुग्णालयात दाखल केले आहे. याच दिवशी त्याची ओमायक्रोनची चाचणीदेखील करण्यात आली. त्याचा अहवाल ठाणे महापालिकेला गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. मास्क वापरावा, सोशलडिस्टन्सचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.