Thane: सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

By अजित मांडके | Published: June 28, 2024 06:23 PM2024-06-28T18:23:19+5:302024-06-28T18:24:21+5:30

Thane News: ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार हि कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे.

Thane: For the second day in a row, the Municipal Corporation has cracked down on illegal pubs-bars and drug-selling shops in the city. | Thane: सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

Thane: सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील बेकायदेशीर पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई

- अजित मांडके  
ठाणे - ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार हि कारवाई शहरातील विविध प्रभागसमिती कार्यक्षेत्रात सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून ९ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

नौपाडा, उथळसर, मानपाडा प्रभागसमिती या परिसरात  दिव्यांगाना देण्यात आलेले स्टॉल व अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणची ८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई ही स्थावर विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या गोपालआश्रम व एंजल बार ॲण्ड रेस्टॉरंट या बारवर कारवाई करण्यात आली. तसेच नौपाडा परिसरातील शाळेपासून शंभर मीटरच्या आत असलेल्या पान टपरीवर  तसेचअंजली बार रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात शाळापरिसरात १०० मीटरच्या आत असलेल्या पानटपरी, अनधिकृत टपऱ्या, बार तसेच  श्रीनगर येथील हवेली धमाल बार वर कारवाई करण्यात आली.

वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या बॉम्बे डक, सूर संगीत बार ही अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्यात आली. कळवा प्रभाग समिती अंतर्गत शाळेजवळ असलेल्या अनधिकृत पानटपरी तसेच दुकानांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रा प्रभागसमिती अंतर्गत शाळा परिसरात असलेल्या अनधिकृत पान टपरी तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचेही अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी गोदेपुरे यांनी नमूद केले.

Web Title: Thane: For the second day in a row, the Municipal Corporation has cracked down on illegal pubs-bars and drug-selling shops in the city.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.