Thane: माजी कर्णधार रणतुंगा यांनी साधला लहान मुलांशी संवाद
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 23, 2023 06:41 PM2023-05-23T18:41:42+5:302023-05-23T18:42:02+5:30
Thane: मंगळवारी स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या "व्यायामशाळेचे उदघाटन" श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : मंगळवारी स्व. रामचंद्र जनार्दन ठाकुर तरणतलाव येथे आ. प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या "व्यायामशाळेचे उदघाटन" श्रीलंकेचे विश्वकप विजेते माजी कर्णधार रणतुंगा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला.
क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य राखणे भारताच्या भविष्यासाठी चांगले आहे. भविष्यात कदाचित आपल्या भागातून सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर देखील निर्माण होऊ शकतात. अनेक दिग्गज क्रिकेटर हे अशाच छोट्या छोट्या भागांतून आलेले असतात असे ते म्हणाले. रणतुंगा यांच्या हस्ते लोकमान्य नगर येथील मुलांना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या क्रिडावृत्तीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आ. प्रताप सरनाईक, यावेळी रणतुंगा यांचे निकटवर्तीय व्यंकट, विहंग सरनाईक उपस्थित होते. पुर्वेश सरनाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.