Thane: मंत्रालयात नोकरी लावण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, दोघे पसार, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 22:01 IST2023-04-04T22:00:01+5:302023-04-04T22:01:37+5:30
Crime News: मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याच्या नावाखाली योगेश तवटे (४२, रा. कोपरी, ठाणे) यांची १४ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Thane: मंत्रालयात नोकरी लावण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, दोघे पसार, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे - मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याच्या नावाखाली योगेश तवटे (४२, रा. कोपरी, ठाणे) यांची १४ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी मंगळवारी दिली.
मुंबईच्या दादर भागात राहणारे विशाल गोणभरे आणि श्याम खतकर या दोघांनी आपसात संगनमत करून ठाण्यातील योगेश तवटे या सुरक्षा रक्षकाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवत त्यांना बनावट कॉल लेटर, बनावट ओळखपत्र आणि शिपायाचा गणवेशही दिला. त्या बदल्यात त्यांच्याकडून १४ लाख ३१ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे, गुगल पे आणि रोखीने स्वीकारली. हा प्रकार २३ नोव्हेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये घडला. तवटे यांना नोकरीला न लावता, त्यांचे पैसेही त्यांना परत करण्यात आले नाहीत. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी ३ एप्रिल २०२३ रोजी कोपरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड हे याप्रकरणी तपास करीत आहेत.