Thane: राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

By कुमार बडदे | Published: August 19, 2023 06:52 PM2023-08-19T18:52:40+5:302023-08-19T18:53:03+5:30

Thane: मुंब्रा येथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील रस्तावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवार पासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे.

Thane: Garbage collection center on National Highway closed | Thane: राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

Thane: राष्ट्रीय महामार्गावरील कचरा संकलन केंद्र बंद

googlenewsNext

 - कुमार बडदे  
मुंब्रा - येथील नागरी वसाहती मधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील रस्तावरील कचरा संकलन केंद्र अखेर शनिवार पासून बंद करण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पादचारी आणि वाहन चालकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे.मुंब्रा  शहरातील कच-याची विल्हेवाट लावण्यचा ठेका घेतलेल्या कंपनी कडून शहराती विविध भागातील कचरा येथील कौसा भागातील तनवर नगर परीसरातील रस्त्यावर प्रथम जमा करुन तो मोठ्या डंपर मधून डम्पिंग ग्राऊंड वर नेला जात होता.ही प्रक्रिया मागील अनेक महिन्यां पासून सुरु होती.

यामुळे दिवसातील बहुतांशी वेळ येथील रस्त्यावर जमा रहाणा-या कच-यामुळे पसरणा-या असाह्य दुर्गधीमुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता होती.तसेच येथून जाताना पादचा-यांना आणि वाहन चालकांना नाक मुठित धरुन जावे लागत होते.यामुळे हे केंद्र बंद करण्यात यावे.यासाठी एमआयएमचे मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सैफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी १० आँगस्टला ठिय्या आंदोलन केले होते.त्यावेळी मुंब्रा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांनी १० दिवसात केंद्र बंद करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.त्यानुसार शनिवार पासून हे केंद्र बंद करण्यात आले.

शहरातील कच-याची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीला दिलेल्या निर्देशा नुसार त्यांनी शनिवार पासून तनवर नगर येथील कचरा संकलन केंद्र बंद केले आहे. 
-  बाळू पिचड
(सहाय्यक आयुक्त, मुंब्रा प्रभाग समिती) 

Web Title: Thane: Garbage collection center on National Highway closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे