Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

By पंकज पाटील | Published: August 11, 2022 07:39 PM2022-08-11T19:39:36+5:302022-08-11T19:40:16+5:30

Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे.

Thane: Good news for Thane district; Barvi dam is 100 percent full | Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

googlenewsNext

- पंकज पाटील
बदलापूर - संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. 11 पैकी धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान धरणाच्या अकरा दरवाजे पैकी आठ दरवाजे उघडले गेले आहेत. हे सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढल्यास या धरणाचे सर्वच्या सर्व अकरा दरवाजे उघडले जाणार आहेत. धरण भरल्याने आता धरणात 334 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

यंदा धरण क्षेत्रात एकूण एक हजार 752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 11 ऑगस्ट रोजी धरण अवघे 82 टक्के भरले होते. गेल्यावर्षी हे धरण सहा सप्टेंबर रोजी १०० टक्के भरले होते. मात्र यंदा 11 ऑगस्टलाच धरण भरल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट संपुष्टात आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण एमआयडीसी क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांना देखील पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बारावी नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उल्हास नदीच्या पात्रात देखील वाढ झाल्याने आता बारवी धरणातील पाणी देखील थेट उल्हास नदीत जाणार असल्याने उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अवघ्या दहा तासात दोन टक्के पाणीसाठा वाढला
गुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्याची पातळी तपासली असता सकाळी धरण 98 टक्के भरले होते. सायंकाळी पाच वाजता हे धरण भरून वाहू लागल्याने अवघ्या दहा तासात धरणातील दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. बारवी धरणाला जोडल्या लहान-मोठे ओढे भरून वाहत असल्याने हे धरण यंदा लवकर भरले आहे. 
 

Web Title: Thane: Good news for Thane district; Barvi dam is 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.