ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:50 PM2019-10-19T23:50:13+5:302019-10-19T23:50:16+5:30

जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघांतील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी सहा हजार ६२१ मतदान केंद्रांवर ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी २९ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत

Thane has 29,000 employees working for 64 lakh voters in Thane | ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत

ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत

Next

ठाणे : जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघांतील २१३ उमेदवारांच्या मतदानासाठी सहा हजार ६२१ मतदान केंद्रांवर ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांच्या मतदानाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी २९ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. या केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.

मतदानप्राप्तीसाठी उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने मतदानकेंद्रांचे नियोजन करून मतदारांनी मोठ्या प्रमाणात सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात भरघोस मतदान करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे उपस्थित होते.

या मतदानासाठी जिल्ह्यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग आदी ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार आहेत. यामध्ये पुरु ष ३४ लाख ७९ हजार ५०८ तर २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय, तृतीयपंथी ४६७ मतदार तर १० हजार ४८९ दिव्यांग मतदार असून, सर्व्हिसमधील एक हजार ५३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात सहा हजार ६२१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. मुख्य मतदानकेंद्रे सहा हजार ४८८ असून सहायक मतदानकेंद्रे १३३ आहेत. यामध्ये ५९१ मतदानकेंद्रे संवेदनशील म्हणून घोषित आहेत. या केंद्रांमध्ये २३ सखी मतदानकेंद्रे’ असून दिव्यांग केंद्रे ११ आहेत. तर, आदर्श मतदानकेंद्रे नऊ आहेत. मतदानप्रक्रि या सुलभपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात मतदानयंत्रे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात सात हजार ९५१ बॅलेट युनिट, नियंत्रण युनिट सात हजार ४९५, व्हीव्हीपॅट आठ हजार ३६३ आहेत. यामध्ये राखीव मतदानयंत्रांचादेखील समावेश आहे. या मतदान केंद्रांवर तैनात २९ हजार कर्मचाऱ्यांंना विशेष प्रशिक्षण दिले असून यात पुरुष कर्मचारी १४ हजार ३१४, तर महिला कर्मचारी १३ हजार ५२६ आहेत.मतदानयंत्रांवर ब्रेल लिपी

अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदानकेंद्रांवरील सूचनाफलक, मतदारयादी ब्रेल लिपीमध्ये तयार केली आहे. मतदानयंत्रांवर ब्रेल लिपी मुद्रित केली आहे. यामुळे आता कोणाच्याही मदतीखेरीज मतदान शक्य आहे.

१९५० हेल्पलाइन

मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन-१९५०.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल. मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप’ही सुरू आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसल्यास मतदाराजवळील सुमारे ११ प्रकारची ओळखपत्रे निश्चित केली आहेत.

पाळणाघर

मतदानास येणाºया महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था केली आहे. मतदारांना एका क्लिकवर मतदानकेंदे्र व मतदारयादीतील त्यांची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मोबाइल वापरास मनाई

मतदानाच्या दिवशी मतदानकेंद्रांवर मतदार, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी आदींना मोबाइल फोन, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेट यांच्या वापर करण्यास मनाई केली असल्यामुळे मतदानकेंद्रांवर मतदारांनी मोबाइल वापरू नये, असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.

Web Title: Thane has 29,000 employees working for 64 lakh voters in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.