मुजोर खाजगी एजन्सीच्या हातात ठाणेकरांचे आरोग्य; पालिकेचे वैद्यकीय अधिकारीही हतबल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 08:22 PM2020-10-20T20:22:10+5:302020-10-20T20:22:39+5:30
CoronaVirus News : कोविडचा सामना करण्यासाठी बाळकूम येथे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. यासाठी वॉररूमची निर्मिती देखील करण्यात आली आहे. ज्यांना या हॉस्पिटलला दाखल व्हायचे असेल त्यांना या वॉररूमच्या माध्यमातून लॉगिन करावे लागते.
ठाणे : कोरोनाचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने वॉररूमच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एका खाजगी एजन्सीला दिली असली तरी या एजन्सीच्या मुजोर डॉक्टरांमुळेच आता ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले, असल्याचा धक्कादायक प्रकार नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी झालेल्या महासभेत उघड केला आहे.
पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा, यासाठी वॉररूमध्ये लॉगिन करूनही ज्या एजन्सीला मान्यता देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच डॉक्टरांकडून ड्राइव्हिंग करत असल्यानेच काहीच करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले तर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर यांनी तर हे काम एजन्सीला देण्यात आले असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे धक्कादायक उत्तर दिले असल्याची माहिती रेपाळे यांनी दिल्यानंतर महापौरांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.
कोविडचा सामना करण्यासाठी बाळकूम येथे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. यासाठी वॉररूमची निर्मिती देखील करण्यात आली आहे. ज्यांना या हॉस्पिटलला दाखल व्हायचे असेल त्यांना या वॉररूमच्या माध्यमातून लॉगिन करावे लागते. मात्र एका खाजागी एका खाजागी एजन्सीला काम देऊन ठाणे महापालिकेने ठाणेकरांचे आरोग्य कसे धोक्यात आणले आहे, याचे उदाहरणच नगरसेवक विकास रेपाळे यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनासमोर दिले.
एका रुग्णाने हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यासाठी वॉर रूमला लॉगिन केले मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रेपाळे यांनी संबंधित एजन्सीच्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर त्यांनी थेट मी ड्रायविंग करत असल्याने मी आता मान्यता कशी देऊ असे उद्धट उत्तर दिले. जर संबंधित डॉक्टर्स तीन तास ड्रायव्हिंग करत असते आणि या काळात या रुग्णाला काही झाले असते तर जबाबदारी कोणी घेतली असती असा प्रश्न विकास रेपाळे यांनी उपस्थित केला. हद्द म्हणजे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी तर एजन्सीला आम्ही काम दिल्यानंतर आम्ही काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले असल्याचे रेपाळे यांनी सांगितले. त्यामुळे रेपाळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
महापौरांनी केली कानउघडणी
आरोग्य यंत्रणा सांभाळण्याचे काम ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे असून आरोग्य यंत्राना कशी फोल झाली आहे हे सांगण्याचे नाही अशा शब्दात महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाची चांगलीच कामउघडणी केली. एजन्सीवर तुम्ही कशाला अवलंबून राहता , यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.