अखेर ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांचा बंद मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:06 PM2018-03-07T16:06:40+5:302018-03-07T16:06:40+5:30
अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रसाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता.
ठाणे : महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणा-या 86 हॉटेल आणि बारपैकी 13 हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने केली आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रसाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. त्यानंतर दुस-या दिवशीही बंदची हाक या हॉटेल, बारवाल्यांनी लावून धरली होती. परंतू आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर हॉटेल व्याविसायिकांनी बंद मागे घेतला आहे. आयुक्तांनी अॅडमिनिस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे.