ठाणे ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:58+5:302021-03-14T04:35:58+5:30

ठाणे : एकीकडे ठाण्यात उन्हाचा पारा वाढू लागला असतांना दुसरीकडे शहरात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्याही दुपटीने वाढताना दिसत ...

Thane is the hotspot of Corona | ठाणे ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

ठाणे ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉट

Next

ठाणे : एकीकडे ठाण्यात उन्हाचा पारा वाढू लागला असतांना दुसरीकडे शहरात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्याही दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या भागात जास्तीचे रुग्ण आढळत आहेत ते भाग मायक्रो हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मार्चच्या पहिल्या १२ दिवसांतच तब्बल दोन हजार ५३८ नवे रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत सर्वाधिक रुग्णांची नोंद माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत झाली आहे. येथे १२ दिवसात तब्बल ६६५ रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण आढळू लागल्याने ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे महापालिकेनेच स्पष्ट केले आहे. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. यात रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, ताप सर्वेक्षणाच्या कामासाठी २५ खासगी डॉक्टरांची नेमणूक करणे, बोरीवडे येथील कोरोना रुग्णालय सुरू करणे ही कामे हाती घेतली आहेत.

दुसरीकडे याच कालावधीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोन हजार २४ एवढी आहे. तर सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील दोन हजार २३८ एवढी आहे. याच १२ दिवसांत शहरात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनाचे ६४ हजार ८७८ रुग्ण आढळले असून ६२ हजार २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एक हजार ४१० जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना मृत्यूदर मात्र आटोक्यात आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६ टक्के एवढेच आहे. असे जरी असले तरी प्रभाग समितीनिहाय विचार केल्यास मागील १२ दिवसात माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक ६६५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर त्या खालाेखाल नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत नव्या ३९३ रुग्णांची भर पडली आहे. तर वर्तकनगरमध्ये ३३७ रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत सर्वात कमी ६० रुग्ण हे मुंब्य्रात आढळले आहेत.

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे शहराची वाटचाल पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांकडे होऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा ३९ ते ४० अंशावर जात असताना दुसरीकडे रुग्णांची संख्याही दिवसागणिक दुप्पट होताना दिसत आहे. त्यामुळे यावर कसे उपाय करावेत अशी चिंता आता महापालिकेला सतावू लागली आहे.

१ ते १२ मार्चपर्यंत आढळलेले रुग्ण

प्रभाग समिती रुग्ण

माजिवडा - मानपाडा - ६६५

वर्तकनगर - ३३७

लोकमान्य सावरकरनगर - १९१

नौपाडा - ३९३

उथळसर - २८७

वागळे - १३५

कळवा - २५४

मुंब्रा - ६०

दिवा - ९९

इतर - १०१

---------------------------

ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या

तारीख - रुग्ण - एकूण रुग्ण - बरे झालेले - मृत्यू

१ मार्च - १३५ - ६२४७५ - ५९४०६ - ०१

२ मार्च - १७८ - ६२६५३ - ५९५५१ - ०२

३ मार्च - २३५ - ६२८८८ - ५९७२५ - ०१

४ मार्च - १८३ - ६३०७१ - ५९८५६ - ०१

५ मार्च - २०५ - ६३२७६ - ५९९९६ - ०३

६ मार्च - २२० - ६३४९ - ६०१७१ - ०१

७ मार्च - १८५ - ६३६८१ - ६०३९४ - ००

८ मार्च - १४९ - ६३८३० - ६०५७८ - ०२

९ मार्च - २०५ - ६४०३५ - ६०७७५ - ०१

१० मार्च - २५६ - ६४२९१ - ६०९८५ - ०२

११ मार्च - २९१ - ६४५८२ - ६१११७ - ०३

१२ मार्च - २९६ - ६४८७८ - ६२२१९ - ०२

Web Title: Thane is the hotspot of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.