Thane: कळवा रुग्णालयाचा वसुनिष्ठ आणि योग्य अहवाल सादर होईल - दीपक केसरकर
By अजित मांडके | Published: August 26, 2023 03:22 PM2023-08-26T15:22:46+5:302023-08-26T15:22:59+5:30
Thane: कळवा रुग्णालयाचा अहवाल येण्यास उशीर होत असला तरी देखील वस्तुनिष्ठ आणि योग्य अहवाल येणे गरजेचे आहे. त्यासाठी याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे कदाचित अहवाल येण्यास उशीर होत असेल असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
- अजित मांडके
ठाणे - कळवा रुग्णालयाचा अहवाल येण्यास उशीर होत असला तरी देखील वस्तुनिष्ठ आणि योग्य अहवाल येणे गरजेचे आहे. त्यासाठी याची सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे कदाचित अहवाल येण्यास उशीर होत असेल असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्य तिथी निमित्त त्यांनी शक्तीस्थळ येथे हजेरी लावली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कळवा रुग्णालयात झालेले मृत्यू ही दुर्देवी बाब आहे.मात्र काही मृत्यू हे कसे झाले का झाले हे पाहणे देखील महत्वाचे आहे. काही रुग्ण हे खाजगी रुग्णालयातून आले होते, काही रुग्ण हे मृत अवस्थेत आले होते. याची विचार होणे गरजचे आहे, असे असले तरी अहवाल लवकरच येईल आणि दोषींवर कारवाई होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कांदा खरेदी करणे आता राज्य सरकारने सुरू केले आहे, त्यासाठी सर्वानी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
शिक्षकाना सर्वेच्या कामात जुंपले जात असल्याने त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे असा सवाल त्यांना केला असता सर्व्हे हा शालेय शिक्षणाचा भाग आहे. मात्र मुलांना न शिकवता सर्व्हे करणे अयोग्य आहे, सर्व्हे हा शाळा सुटल्यानंतर ही केला जाऊ शकतो, सर्व्हेच्या माध्यमातून कोण निरक्षर आहे याची माहिती घेतली जात आहे, जेणे करून त्यांना साक्षर करता येणे यामुळे सोपे होणार आहे. मात्र शाळेच्या वेळेत जर शिक्षक सर्व्हे करीत असतील तर त्याची चॉकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले. फोन टेपिंग प्रकरणात फडणवीस यांना सीबीआयने क्लीन चिट दिली असून तसा कॉलजर रिपोर्ट सादर केला आहे या संदर्भात त्यांना विचारले असता मधल्या काळात फडणवीस असतील किंवा महाजन असतील यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप झाल्याचं त्यांनी सांगितले. एकूणच त्यावेळी त्यांना विनाकारण गुंतवन्याचा झालेल्या प्रयत्नांना आता हे चूक उत्तर आहे असे देखील त्यांनी सांगितले.