ठाणे, कल्याण साथ-साथ

By admin | Published: July 13, 2016 01:58 AM2016-07-13T01:58:24+5:302016-07-13T01:58:24+5:30

पावसाने जोर धरताच ठाण्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, काविळ, गॅस्ट्रो या आजारांनी थैमान घातले आहे. तापाच्या रुग्णांमध्येही कित्येक पटीने वाढ झाली

Thane, Kalyan together | ठाणे, कल्याण साथ-साथ

ठाणे, कल्याण साथ-साथ

Next

ठाणे : पावसाने जोर धरताच ठाण्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा, काविळ, गॅस्ट्रो या आजारांनी थैमान घातले आहे. तापाच्या रुग्णांमध्येही कित्येक पटीने वाढ झाली असून अनेक डॉक्टरांच्या दवाखान्यात शेकडो पेशंट तासनतास तिष्ठत बसल्याचे दिसत आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत ३८० घरांत साठवलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासांची पैदास आढळून आली असून एकूण ९८ विकासकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गेले दोन आठवडे पावसाने जोर धरताच ठाण्यातील अनेक भागातून दूषित पाण्याच्या व त्याचबरोबर काविळ, गॅस्ट्रो यासारख्या आजारांनी डोके वर काढल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक भागात गटारातून पाण्याचे पाईप जातात. काही ठिकाणी हे पाईप गंजून खराब झाल्याने नळाला पिवळे ंिकंवा काळ््या रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे पाणी प्यायल्याने अनेकजण आजारी पडले आहेत.
ठाण्यातील जवळपास सर्व फॅमेली डॉक्टरांचे व विशेष करून लहान मुलांच्या डॉक्टरांचे दवाखाने पेशंटने हाऊसफूल झाले आहेत. सर्दी, खोकला व ताप यामुळे आबालवृद्धांना ग्रासले आहे. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप बरा होत नसेल तर तत्काळ रक्ततपासण्या करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. कारण हा ताप मलेरिया, डेंग्यु किंवा टायफॉइड असू शकतो. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जानेवारी ते जुलै या कालावधीत २०८ डेंग्युचे संशयित रुग्ण आढळले असून तपासाअंती त्यातील प्रत्यक्ष ७३ जणांना डेंग्युची लागण झाली होती. ३८० घरांमधील साठविलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासांची पैदास आढळून आली. डेंग्यु व मलेरियाच्या रुग्णांची संख्या यंदा कमी असल्याचा आरोग्य खात्याचा दावा असला तरी खासगी डॉक्टर्स तो मान्य करायला तयार नाहीत. दरवर्षीच अशी दडवादडवी आरोग्य खाते करते, असा त्यांचा दावा आहे. यंदा जुलै महिन्यापर्यंत ४६ हजार ४०६ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील ३३५ जणांना मलेरीयाची लागण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै या कालावधीत कॉलराचे २१ रुग्ण आढळले असून त्यापैकी एप्रिलमध्ये एक आणि जूनमध्ये दोन अशा तिघांचा मृत्यू झाला. मागील वर्षी काविळचे १२ रुग्ण आढळले. यंदा ६१ जणांना काविळ झाली आहे. गॅस्ट्रोमुळे २२ जण आजारी आहेत. डिसेन्ट्रीचे मागील वर्षी १५० रुग्ण आढळले होते. यंदा १९३ रुग्ण आढळले. टायफॉईडचे यंदा ४१ रुग्ण आढळले असून मागील वर्षी हा आकडा केवळ ८ होता. यंदा लेप्टोचे २ आणि स्वाईनचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मागील वर्षी स्वाईनचे १७७ रुग्ण आढळले होते. ा्रतिनिधी)

भातसानगर : शहापूर तालक्यातील रु ग्णालये साथीच्या आजाराच्या रु ग्णांनी गजबजल्याचे दृश्य सर्वत्र पहावयास मिळत आहे. खासकरून खाजगी रु ग्णालये फुल्ल झाल्याने सरकारी रूग्णालयात रु ग्णांना पावसातच बाहेर उभे राहवे लागत आहे. या रु ग्णांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. शहापूर उप जिल्हा रु ग्णालयात आतापर्यंत डेंग्यूचे २ संशयित रु ग्ण, मलेरियाचे ३ तर टायफॉईडचे २६ रु ग्ण आढळले आहेत. पाऊस असाच पडत राहिल्यास आणखी आजार बळावणार असून आहेत. तालुक्यात सतत पडणा-या पावसामुळे आजार बळावत असले तरी त्यावर उपाययोजना तयार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी ए.राठोड यांनी सांगितले.त् ार सर्व दवाखान्यात आवश्यक ती सर्व औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी संघर्ष सेनेचे हरिश्चंद्र पाटील यांनी केली आहे.
गॅस्ट्रोमुळे कसारानजीकच्या पाटोळ येथील किरण चंदर गिऱ्हा (५) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण याला सतत जुलाब होत असल्याने त्याला सोमवारी सकाळी आरोग्य विभागाच्या कॅम्पमधून औषध देण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दूषित पाण्यामुळे कसाराजवळील वाशाळा, कोथळा, पाटोळ आदी पाड्यांमध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. ग्रामस्थ एका डबक्यातील पाणी पित असल्याने पाटोळमध्ये गॅस्ट्रोची लागण झाली अहे. ग्रामस्थांनी डबक्याऐवजी विहिरीतील पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सतत बदलणारे वातावरण, विषाणूंचा संसर्गआणि डासांच्या वाढलेल्या संख्येमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात तापाच्या रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. दवाखाने, रूग्णालयात रूग्णांची आणि त्यांच्या नातलगांची गर्दी ओसंडून वाहते आहे.
पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र पावसाळ््यात तापाची लागण झालेले रुग्ण वाढणारच, हा व्हायरल फिवर असतो, असे सांगून त्यांनी पालिका हद्दीत कोणतीही साथ नसल्याचे स्पष्ट केले. तापाची साथ नसल्याचा दावा पालिका करत असली तरी दवाखाने हाऊसफुल्ल आहेत. खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी रूग्णांची गर्दी आहे. महापालिका सांगत असलेल्या आकडेवारीपेक्षा रूग्णांची संख्या मोठी असल्याचे खाजगी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी सांगितले, पालिकेच्या दैनंदिन आरोग्य पाहणी अहवालात मंगळवारी दिवसभरात पाच हजार ६४५ घरांचे सर्वेक्षण केले. त्यात २६ हजार २९२ लोकसंख्या कव्हर झाली. २२ पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले. त्यात क्लोरिनचे प्रमाण योग्य आढळून आले. १०९ क्लोराईटच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
महापालिकेच्या दिवसभराच्या सर्वेक्षणातून तापाचे २६ रुग्ण आढळून आले आहेत. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण पालिका करत नाही. जोखीम असलेल्या झोपडपट्टी परिसरात करते.
जानेवारी ते जूनअखेर पालिका हद्दीत ३ हजार ३७० जणांना तापाची लागण झाली आहे. त्यापैकी १७ जणांना मलेरिया झाला होता. ापालिका हद्दीत २८५ रुग्णालये आहेत. त्यांच्याकडून रुग्णांची माहिती मागविली जाते. ती दर बुधवारी व शनिवारी पालिकेस दिली जाते. पण जुलैअखेरचा अहवाल अद्याप तयार नाही.

डासांचे प्रमाण प्रचंड
पावासाच्या उघडीपीच्या काळात दोन्ही शहरांत डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यासाठीची फवारणी बंद आहे.
साचलेल्या पाण्याचा निचरा केला जात नाही. त्यामुळे मलेरियाचे रूग्ण वाढले आहेत.
डेंग्युसदृश्य रूग्णांची संख्याही वाढते आहे, अशी माहिती खाजगी डॉक्टरांनी दिली.

Web Title: Thane, Kalyan together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.