नियोजन, तंत्रज्ञानासह ढिसाळ कामगिरीमुळे ठाणे, केडीएमसी,वसईची घसरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:39 AM2021-03-06T04:39:01+5:302021-03-06T04:39:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीने बाजी मारली आहे. मात्र, केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृह मंत्रालयाने यासाठी आखून दिलेल्या निकषांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवलीने प्रामुख्याने तंत्रज्ञान, शहर नियोजन आणि एकंदरीत महापालिकेचे कामकाज, नागरिकांना दिल्या जणार्या सुविधा यात मार खाल्ला आहे. महापालिकेच्या आर्थिक कमकुवततेचाही फटका कल्याण-डोंबिवलीला बसला आहे.वसई-विरार महापालिकेची याच निकषांत घसरगुंडी झाली आहे.
या यादीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईने बाजी मारली असून, पुण्यानंतर ते राज्यातील पहिल्या दहा शहरांमध्ये एकमेव शहर आहे. या यादीत पुणे दुसऱ्या तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ठाणे ११व्या आणि कल्याण-डोंबिवली १२व्या स्थानावर आहे. कल्याण-डोंबिवलीची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे. नवी मुंबईसह ठाणे शहराचा दर्जा गेल्या वर्षापेक्षा यंदा घसरल्याने दोन्ही महापालिकांच्या प्रशासनाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.तंत्रज्ञानात मार खाल्ल्याने स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या या सर्व शहरांनी चांगलीच घसरगुंडी झाली आहे. जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या महानगरांची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी असल्याने त्यांचा विचार यात केंद्राने केलेला नाही.
ठाणे
निकष गुण क्रमांक
राहण्यायोग्य शहर ५८.१६ ११
नागरिकांची आर्थिक क्षमता ४०.५२ ५
नागरिकांचा दृष्टिकोन ७२.८० ३७
जीवनमानाचा दर्जा ५५.०४ १६
शाश्वत ५४.०४ ३०
महापालिकेची कामगिरी ४७.०४ २५
महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.६२ ३३
नियोजन ३९.१६ २३
सेवा ५९.६५ १६
तंत्रज्ञान २१.७६ ३८
प्रशासन ४९.४४ २०
...................
कल्याण-डोंबिवली
निकष गुण क्रमांक
राहण्यायोग्य शहर ५७.७१ १२
नागिरकांची आर्थिक क्षमता १९.८९ १७
नागरिकांचा दृष्टिकोन ७७.६० २१
जीवनमानाचा दर्जा ५७.८० ९
शाश्वत ५६.११ २५
महापालिकेची कामगिरी ४६.३६ २६
महापालिकेची आर्थिक स्थिती ४८.४७ ३८
नियोजन २९.१९ २३
सेवा ५९.६५ ३७
तंत्रज्ञान २५.८० २८
प्रशासन ५८.२५ ८
.................................................................................
वसई-विरार
निकष गुण क्रमांक
राहण्यायोग्य शहर ५१.२६ ३९
नागिरकांची आर्थिक क्षमता १०.८९ ३१
नागरिकांचा दृष्टिकोन ७२.६० ३८
जीवनमानाचा दर्जा ५१.८४ २८
शाश्वत ४८.५३ ४५
महापालिकेची कामगिरी ४०.८६ ४१
महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.८८ ३२
नियोजन ३१.७९ ३५
सेवा ४५.३२ ४६
तंत्रज्ञान २२.०४ ३७
प्रशासन ४५.०६ २८