Thane: "आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा", प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 22, 2024 03:35 PM2024-08-22T15:35:08+5:302024-08-22T15:35:46+5:30

Pratap Saranaik News: महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहित मुदतीत म्हणजे २१ दिवसाच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. आंध्रप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली.

Thane: Like Andhra Pradesh, a law should be introduced in Maharashtra to provide punishment to the accused within 21 days, Pratap Saranaik demanded. | Thane: "आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा", प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

Thane: "आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा", प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे - दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या गोविंदांना गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील या दहीहंडीला उपस्थित असणार आहे. 

देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी २०१९ मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता, १८६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्र. ५० आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले होते. आंध्रप्रदेश राज्याने भारतीय दंड सहितेच्या कलम ३७६ व ३७६ अ मध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे. महिलेची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा ७ दिवसात तपासात पूर्ण करणे. न्यायालयाने १४ दिवसात सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास २१ दिवसाच्या आत आरोपीस शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचे आहे. अशी तरतूद सदर सुधारित कायद्यात अंतर्भूत आहे.

महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहित मुदतीत म्हणजे २१ दिवसाच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे देशातील पहिले राज्य आहे. आंध्रप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. या विधेयकाची प्रत दहीहंडीच्यादिवशी मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहे. याबाबतची जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल.

दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तक नगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ लाख व आकर्षक ट्रॉफी, ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, ७ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, ५ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहे.

Web Title: Thane: Like Andhra Pradesh, a law should be introduced in Maharashtra to provide punishment to the accused within 21 days, Pratap Saranaik demanded.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.