महायुतीच्या ‘ठाणेदार’ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:48 PM2024-04-01T12:48:40+5:302024-04-01T12:49:35+5:30
Thane Lok Sabha constituency: महायुतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्याने ठाणे लोकसभेसाठी ‘ठाणेदार’ मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
ठाणे - महायुतीच्या जागावाटपाबाबत एकीकडे चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्याने ठाणे लोकसभेसाठी ‘ठाणेदार’ मिळाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजस्थानी व्यक्तींचा राजस्थान भूषण पुरस्काराने गौरव केला. यात महेंद्र जैन, राकेश मोदी, उदय परमार, भूपेंद्र भट आणि उत्तम सोलंकी यांचा समावेश आहे. तर, आ. गीता जैन, रेखा सहा, इंदिरा वैष्णव यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरवले. याप्रसंगी आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, अखिल भारतीय सीरवी समाज महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष दिनेश कुमार चौधरी आदी उपस्थित होते.
डॉ. नाईक यांच्याशी हस्तांदोलन
राजस्थान स्थापना दिनानिमित्ताने वर्तकनगर येथे राजस्थान विकास मंच, ठाणे शहर यांच्या वतीने झालेल्या ‘एक शाम राजस्थान स्थापना दिवस के नाम’ या सांस्कृतिक विशेष कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी खासदार डॉ. नाईक यांच्याशी हस्तांदोलन करीत हितगुज केले.
मुख्यमंत्री शिंदे आणि डॉ. नाईक यांच्यातील या भेटीमुळे ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा ‘ठाणेदार’ ठरल्याची वदंता शहरात आहे.
दरम्यान, याविषयी शिंदेसेना तसेच भाजपकडून अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केले नसले तरी, उभय पक्षांकडून तसेच अजित पवार गटाकडूनही डॉ. नाईक यांनाच कौल असल्याचे सूचित केले जात आहे.