ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत राजन विचारेंना आनंद परांजपेंपेक्षा दुप्पट मतं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:03 AM2019-05-23T10:03:46+5:302019-05-23T10:04:54+5:30
Thane Lok Sabha Election Results 2019: पहिल्या फेरीत शिवसेना पुढे
२०१४च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे यांनी जोरदार मुसंडी मारली असली, तरी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे त्यांना 'काँटे की टक्कर' देतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून ठाण्यात पहिल्या फेरीनंतर राजन विचारे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १६ हजार ३२७ मतं असून आनंद परांजपे ८ हजार ५५१ मतांवर आहेत.
२०१४च्या निवडणुकीत राजन विचारे यांनी ५ लाख ९५ हजार ३६४ मतांनी विजय साकारला होता, तर संजीव नाईक ३ लाख १४ हजार ०६५ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. मनसेचे अभिजीत पानसे यांना ४८ हजार ८६३ मतं मिळाली होती.
ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ लाख ०७ हजार १८९ मतदार असून यंदा ४९.२१ टक्के मतदान झालं आहे.