वर्षानुवर्षे व्होटिंग करणाऱ्यांचे नावे नसल्याने मतदारांचा संताप
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 20, 2024 09:27 AM2024-05-20T09:27:39+5:302024-05-20T09:28:45+5:30
कोणत्याही पात्र मतदाराचे मतदारयादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही, असे मा.निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेले 20 ते 40 वर्ष न चुकता मतदान करणाऱ्या नौपाडा भागातील नागरिकांचे मतदार यादीतून यंदा नाव नसल्याने त्यांचा संताप झाला आहे. तेथे उपस्थित असलेल्या बीएलओ यांना विचारले असता त्यांनी अर्ज क्रमांक 17 भरण्याचं त्यांना सांगितलं यावेळी त्या अर्जाची मागणी केली असता तो अर्ज आमच्याकडे नाहीत असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आता आम्ही काय करायचं असं या नागरिकांनी प्रश्न विचारला आहे.
यापैकी एक नागरिक योगेश प्रसादे असे म्हणाले की मी गेली 30 ते 35 वर्ष सरस्वती शाळेमध्ये मतदान करत आहे गेल्या वर्षी आमची इमारत पडली असताना सुद्धा त्यावेळेला माझं मतदार यादीत नाव होतं परंतु यंदा यादीमध्ये नाव नाही आता कसे काय मतदान करता येईल याचे मार्गदर्शन देखील आम्हाला मिळत नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोणत्याही पात्र मतदाराचे मतदारयादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही, असे मा.निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही.