Thane: मद्यपीने घेतला मित्राच्या कानाचा चावा
By जितेंद्र कालेकर | Updated: February 26, 2025 23:42 IST2025-02-26T23:42:22+5:302025-02-26T23:42:38+5:30
Thane Crime News: दारूच्या नशेतच झालेल्या वादावादीतून आपल्याच ३७ वर्षीय मित्राच्या कानाचा विकास मेणन याने चावा घेतल्याची घटना बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेणन याच्याविरुड गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

Thane: मद्यपीने घेतला मित्राच्या कानाचा चावा
- जितेंद्र कालेकर
ठाणे - दारूच्या नशेतच झालेल्या वादावादीतून आपल्याच ३७ वर्षीय मित्राच्या कानाचा विकास मेणन याने चावा घेतल्याची घटना बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेणन याच्याविरुड गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा भागातील हिरानंदानी इस्टेट मधील एका इमारतीमध्ये हा मित्र वास्तव्याला आहे.
याच मित्राच्या घरी मेणन त्याच्यासोबत मद्य प्राशन करण्यासाठी बसला होता. एका विषयावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. याच वादातून मेणन याने आपल्या मित्राच्या कानाचा चावा घेऊन त्याला रक्तभंबाळ केले. त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून कसरवडवली पोलिस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.