नारायण राणे अंगार है... महापौरांची जीभ घसरते तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:58 PM2021-08-24T15:58:06+5:302021-08-24T15:58:38+5:30

सोशल मिडियावर व्हिडीओ वायरल, भाजपने घेतले तोंडसुख

thane mayor make statement on narayan rane arrest | नारायण राणे अंगार है... महापौरांची जीभ घसरते तेव्हा

नारायण राणे अंगार है... महापौरांची जीभ घसरते तेव्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे  : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले. महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी देत त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. परंतु या घोषणाबाजी सुरु असतांनाच महापौरांची जीभ घसरली आणि ते नारायण राणो अंगार है.. बाकी सब भंगार है.. अशी घोषणा केली आणि तोच व्हिडीओ सोशल मीडियावर भाजपने वायरल करीत महापौरांनी देखील राणो यांचे अस्तिव मान्य केले असल्याची टिका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणो यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. ठाण्यातही विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच नौपाडा पोलीस ठाण्यात राणे  यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी लावून धरली. यावेळी संतप्त शिवसैनिकांच्या वतीने राणो यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कोंबडी चोर नारायण राणोला अटक करा, नारायण राणे  भंगार है.. शिवसेना अंगार है.. अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यामुळे या घोषणोत येथील वातावरण ढवळून निघाले असतांनाच, अचानक नारायण राणो अंगार है.. बाकी सब भंगार है.. ची घोषणा कानी पडली. महापौर नरेश म्हस्के यांनी ती घोषणा केल्याचे वायरल झालेल्या व्हिडीवोत स्पष्ट दिसत आहे. परंतु ही घोषणा होत असतांनाच काही शिवसैनिकांना महापौरांच्या या घोषणोने बुचकुळ्यात पाडल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यावर नेमके काय बोलायचे असा पेच काही पदाधिका:यांच्या चेह:यावर दिसत होता.

दरम्यान म्हस्के यांचा अवघ्या पाच सेंकदाचा व्हिडीओ भाजपच्या वतीने विविध सोशल मिडियावर वायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून महापौरांनी देखील नारायण राणो अंगार है हे मान्य केल्याची टिप देण्यात आली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ महापौरांर्पयत पोहचल्यानंतर त्यांनी मात्र या व्हिडीओत छेडखानी झाल्याचे सांगत, आंदोलनाचा धसका घेत हा व्हिडीओ खोडसाळपणो तयार  करुन वायरल करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. दुसरीकडे आमच्या अंगावर आल्यास आम्ही देखील जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शिवसेनेला दिला आहे.
 

Web Title: thane mayor make statement on narayan rane arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.