ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा : जमदाडे ठरला ‘महापौर केसरी’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:51 AM2018-12-29T02:51:10+5:302018-12-29T02:51:14+5:30
ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला.
ठाणे : ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला. जमदाडे याला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी चांदीची गदा आणि रोख एक लाख रुपये देऊन गौरवले. उपविजेता ठरलेला समाधान पाटील याला मानचिन्ह व रोख ७५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले.
जिल्हास्तरीय प्रौढांमध्ये विविध १० वजनी गटांत ही स्पर्धा पार पडली. सर्व गटांसाठी अनुक्र मे प्रथम पारितोषिक ७,५००, द्वितीय पाच हजार, तृतीय क्रमांकासाठी २,५०० रुपयांची दोन पारितोषिके देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय कुमार गटात ४५ किलो ते ११० किलो वजनी गटात ही स्पर्धा झाली. प्रथम क्र मांकास पाच हजार, द्वितीय तीन हजार, तर तृतीयसाठी १५०० रु पयांची दोन पारितोषिके देण्यात आली. जिल्हास्तरीय महिला गटातदेखील १० गटांत ५० किलोपासून ते ७६ किलो वजनी गटात स्पर्धा पार पडली. या गटात प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय चार हजार, तर तृतीयसाठी २,५०० रुपयांची दोन पारितोषिके देण्यात आली. या सोहळ्यास सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेविका मीनल संख्ये, क्र ीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दीपक वेतकर, ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, सचिव रामकांत पाटील, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, पै. रंगराव पाटील उपस्थित होते.
३५0 मल्ल सहभागी
कोल्हापूरचा कौतुक डाफळे आणि समीर देसाई यांना तृतीय व चतुर्थ क्र मांकांवर समाधान मानावे लागले. त्यांना अनुक्र मे ६० हजार आणि ४० हजार रु पये व सन्मानचिन्ह देण्यात आले. तीन गटांत या कुस्ती स्पर्धा खेळवण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.