रुग्णालयाचा निष्काळजीपणा! चुकीचा रिपोर्ट दिल्याने गरोदर महिलेची फरफट; मनसेने दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:16 AM2020-06-13T10:16:09+5:302020-06-13T10:35:31+5:30

कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित प्रशासनावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

thane mns avinash jadhav help pregnant women in thane | रुग्णालयाचा निष्काळजीपणा! चुकीचा रिपोर्ट दिल्याने गरोदर महिलेची फरफट; मनसेने दिला मदतीचा हात

रुग्णालयाचा निष्काळजीपणा! चुकीचा रिपोर्ट दिल्याने गरोदर महिलेची फरफट; मनसेने दिला मदतीचा हात

googlenewsNext

ठाणे - ठाणे कशेळी येथील एका 34 वर्षीय गरोदर महिलेला महापालिकेच्या वतीने कोरोनाचा रिपोर्ट चुकीचा दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. ठाणे आणि मुंबई येथील अनेक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने या गरोदर महिलेला कळा सोसाव्या लागल्या आहेत.अखेर एका सामाजिक कार्यकार्याने ही बाब लक्षात येताच या महिलेच्या चुकीचा रिपोर्ट आल्याचा त्या महिलेशी विचारपूस करण्याचा व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओमुळे मनसे या महिलेच्या मदतीस धावून आली. अखेर मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिलेला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

ठाणे महानगर पालिका हद्दीत खासगी लॅबकडून कोरोनाचा रिपोर्ट चुकीचा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता पालिका स्थरावर चुकीचा कोरोनाचा रिपोर्ट दिल्याचे एका व्हायरल व्हिडिओमार्फत समोर आले आहे. 34 वर्षीय एका गरोदर महिलेला कळवा छत्रपती  शिवाजी महाराज रुग्णालयातून कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणून मेसेज पाठवला आणि त्यानंतर त्यांना सिव्हिलला जाण्यास सांगितले तर सिव्हिल रुग्णालय यांनी नायर रुग्णालयात पाठवले तर नायर रुग्णालय यांनी शहानिशा केली त्यांच्या जवळील पेपर चेक करून संबंधित नाव महिलेचे नसल्याचे सांगून रिपोर्ट चुकीचा असल्याचे सांगण्यात आले. त्यांना परत ठाण्यात पाठवले. 

नायर रुग्णालयाने देखील उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. महिलेसोबत तिचे कोणीही नातेवाईक नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते मंगेश जोशी यांनी या महिलेला ठाण्यात आणले आणि ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा दाखल करून घेतले. पालिका प्रशासनाने चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे या गरोदर महिलेचे हाल झाले, तसेच कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित पालिका प्रशासनावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे, आता पालिका प्रशासन याबाबत काय पाऊल उचलते हे पाहणे गरजेचे राहणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ

CoronaVirus News : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

Web Title: thane mns avinash jadhav help pregnant women in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.