ठाण्यात खासदार डॉ. शिंदेंनी केली रुग्णालयाची पाहणी; उल्हासनगरात १५ ते १८ वयोगटातील १ हजार ५० मुलांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:54 PM2022-01-03T19:54:58+5:302022-01-03T19:55:19+5:30
शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणाला सुरवात होऊन पहिल्या दिवशी १ हजार ५० मुलांचे लसीकरण झाल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरणाला सुरवात होऊन पहिल्या दिवशी १ हजार ५० मुलांचे लसीकरण झाल्याची माहिती उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. १५ ते १८ वयोगटातील मुलांची एकून संख्या २७ हजार ६४४ असून जानेवारी महिन्यात लसीकरण पूर्ण होण्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले.
उल्हासनगर महापालिकेने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी एकून सहा केंद्र सुरू करून पहिल्या दिवसी १ हजार ५० मुलांचे लसीकरण झाले. अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. लसीकरण सुरू राहणार असून टप्यातल्याने एकून २७ हजार ६४४ मुलांचे लसीकरण जानेवारी महिन्यात पूर्ण करण्याचे संकेत उपयुक्त जाधव यांनी दिली. जाधव यांनी आरोग्य पथकासह लसीकरण केंद्राला भेटी देऊन मुलांचा उत्साह वाढविला आहे. तसेच मुलांनी लसीकरण करण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान महापालिकेच्या रिजेन्सी अंटेलिया येथे उभे राहिलेले कोविड रुग्णालयांची पाहणी करून रुग्णालयाचे लवकरच उदघाटन करण्याचे संकेत दिले.
महापालिका आयुक्त डॉ राजा रिजवानी, उपयुक्त अशोक नाईकवाडे, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, विरोधीपक्षनेते राजेश वानखडे, स्थायी समिती सभापती टोनी लालवानी यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय उभे राहिले आहे. जानेवारी महिन्यात रुग्णालयाचे उदघाटन होण्याची शक्यता पालिका आरोग्य विभागाकडून संकेत मिळत आहे.