ठाणे शहरातील तीन रूग्णालये सील न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्ताचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 03:25 PM2020-08-26T15:25:36+5:302020-08-26T15:26:15+5:30

न्यायालयाच्या निर्णयाची ठाणे महापालिका आयुक्तांकडून अंमलबजावणी सुरू

thane municipal commisioner orders to seal three hospitals after court verdict | ठाणे शहरातील तीन रूग्णालये सील न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्ताचे आदेश 

ठाणे शहरातील तीन रूग्णालये सील न्यायालयाच्या निर्णयानुसार महापालिका आयुक्ताचे आदेश 

Next

ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तसेच अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र व बायोमेडिकल सुविधा नसल्याने ठाणे शहरातील तीन रूग्णालये बुधवारी सील करण्यात आली. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. ठाणे शहरातील साईसेवा हेल्थ सेंटर, भास्करनगर, कळवा, जनसेवा हाॅस्पीटल, वाघोबानगर, कळवा आणि श्री मातोश्री आरोग्य केंद्र, वाघोबानगर, कळवा ही रूग्णालये अनधिकृत असल्याबाबतची जवहित याचिक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सदरची रूग्णालये बंद करण्याचा निर्णय दिला होता.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सदर रूग्णालयांना नोटीस देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत का याची तपासणी करण्यात आली होती. सदर तपासणीमध्ये रूग्णालयांकडे फायर एनओसी आणि बायोमेडिकल वेस्ट सुविधा नसल्याने सदर रूग्णालये बंद करण्याची नोटिस दिली होती. तथापि नोटीस दिल्यानंतरही सदर रूग्णालये सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सदरची रूग्णालये सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मुरूडकर यांनी बुधवारी सकाळी ही तीनही रूग्णालये सील केली.

Web Title: thane municipal commisioner orders to seal three hospitals after court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.