ठाणे पालिका आयुक्तांच्या पत्नी, मुलीला डेंग्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:08 AM2018-07-13T06:08:12+5:302018-07-13T06:08:24+5:30
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी आणि मुलगी स्नेहा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी आणि मुलगी स्नेहा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना
ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्या दोघींची प्रकृती मात्र स्थिर असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी
दिली. डेंग्यूची लागण झाल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांना ९ जुलै रोजी रु ग्णालयात दाखल केले आहे.
घोडबंदर येथील पातलीपाडा येथे पालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान आहे. हा बंगला सोडून काही दिवसांपूर्वीच त्यांचे कुटुंबीय
वांद्रा येथे राहायला गेले आहे. त्यामुळे त्यांना डेंग्यूची लागण ठाण्यात झाली नसल्याचे पालिका अधिकाºयांनी स्पष्ट केले. दोघींच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. कुटुंबीय वांद्रा येथे राहत असून मी एकटा ठाण्यात राहत असल्याचे ते म्हणाले.
मुलांच्या शिक्षणासाठी जयस्वाल यांचे कुटुंबीय सध्या वांद्रा येथे स्थलांतरित झाले आहे. ठाण्यात त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. केवळ ते उपचारासाठी ठाण्यात आल्याचेही पालिकेने सांगितले.