Thane: महापालिका आयुक्तांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
By अजित मांडके | Published: May 1, 2023 03:40 PM2023-05-01T15:40:57+5:302023-05-01T15:41:07+5:30
Thane: घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.
- अजित मांडके
ठाणे : नाले सफाईच्या कामांचे सोशल आॅडीट होणे गरजेचे आहे. नालेसफाई ही झालीच नाही पाहिजे या दृष्टीने काम केले पाहिजे, पाण्याची समस्या आजही शहरात अनेक ठिकाणी भेडसावत आहेत, पाण्याच्या समस्या आॅफीसमध्ये सोडविता येणार नाही. घरोघर जाऊन रोजच्या रोज कचरा उचलला गेला पाहिजे, रस्ते सफाईच्या कामात बदल होणे अपेक्षित आहे, याशिवाय सोशल मिडिया विभाग तर सर्वच स्तरावर कमी पडत असल्याचे सांगत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाºयांचे कान टोचले.
महाराष्टÑ दिनी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाणेकर नागरीकांशी संवाद साधला. यावेळी राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या उल्लेखनीय कामगिरी करणाºया ठाणे महापालिकेचा गौरव केला होता. त्याच अनुषंगाने आयुक्तांनी देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभागाचा सत्कार केला. परंतु हा सत्कार करीत असतांना हरळून जाऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. ठाणेकर नागरीकांसाठी आपण काम केले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. तक्रारींचे प्रमाण हे कमी झाले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मालमत्ता कर विभागाने यंदा ८०० कोटी नाही तर १ हजार कोटींचे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी सुचनाही केली. आपण देत असलेल्या सेवा, सुविधा अशा दिल्या पाहिजे की त्याचा अभिमान हा ठाणेकरांना वाटायला हवा. शहर सौंदर्यीकरणात केवळ रंगरंगोटी महत्वाची नाही तर रस्ते, उद्याने, सेवा रस्ते, फुटपाथ आदींसह इतर गोष्टी देखील त्यात महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
विभाग कोणाचा हे न पाहता, ठाणेकरांना चांगल्या सेवा कशा देता येतील हे पाहणे महत्वाचे आहे, महापालिका चुकत असले तर त्यासाठी ठाणेकरांनी देखील त्या चुका दाखविणे गरजेचे आहे. महापालिकेवर २२०० कोटींचे दायीत्व असतांना आजही शहरात कामे सुरु आहेत. परंतु चांगली कामे होणे गरजेचे आहे. शहरात लावण्यात आलेल्या साईन बोर्डवरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील उद्यानांची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज शाळेतील मुलेही रस्त्यावर खड्डे का असा सवाल करीत आहेत. मात्र आपण ठरविले तर शहरातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. तशी मानसिकता असायला हवी तरच कामे चांगली होतील असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत दिलेल्या वेळेतच कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. दूषीत पाणी जातेच कसे असा सवाल उपस्थित करीत केवळ आॅफीसमध्ये बसून पाण्याच्या समस्या सुटणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाईच्या कामांचे सोशल आॅडीट झाले पाहिजे, कचरा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. रस्ते सफाई देखील समाधानकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही पालिकेचा जो सोशल विभाग आहे, तो कामात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोणतीही तक्रार ही १२ तासांच्या आत सोडविली गेली पाहिजे. कर्मचाºयांच्या देखील समस्या आहेत, त्या सोडविल्याच गेल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.