ठाणे महानगरपालिका पुन्हा ऊर्जा संवर्धनात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:49 AM2019-02-25T05:49:51+5:302019-02-25T05:49:55+5:30

दोन राज्यस्तरीय पुरस्कार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरव

Thane Municipal Corporation again tops in energy conservation | ठाणे महानगरपालिका पुन्हा ऊर्जा संवर्धनात अव्वल

ठाणे महानगरपालिका पुन्हा ऊर्जा संवर्धनात अव्वल

googlenewsNext

ठाणे : गेली अनेक वर्षे ऊर्जा संवर्धन, ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी ठाणे महानगरपालिका राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. तेराव्या ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारांनी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर व विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गेली १३ वर्षे ऊर्जा संवर्धन, कार्यक्षमता या क्षेत्रांत सातत्याने पुरस्कार मिळवणारी ठाणे ही एकमेव महापालिका ठरली आहे. मागील अनेक वर्षांपासून ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन, कार्यक्षमता आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर या क्षेत्रात महापालिका उल्लेखनीय कामगिरी करत आहे. ठामपाच्या राज्यस्तरीय आणि राष्टÑीय पातळीवरील विविध प्रकल्पांची दखल घेऊन राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या तेराव्या ऊर्जा संवर्धन तसेच व्यवस्थापनाच्या दोन राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कारांनी महापालिकेला सन्मानित करण्यात आले.

विविध प्रकल्पांची घेतली दखल
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हाती घेण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धनाच्या विविध प्रकल्पांची दखल घेऊन ‘सर्टिफिकेट आॅफ मेरिट’ या विशेष पुरस्कारानेही ठामपाचा सन्मान झाला. पालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी एलईडी लाइटचा केलेला प्रभावी वापर, महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा संवर्धन उपकरणांचा वापर, पालिकेच्या विविध इमारती तसेच शाळांवर सौरऊर्जा प्रकल्प, सार्वजनिकवाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसला चालना तसेच यूएनडीपी प्रकल्पांतर्गत डिस्ट्रिक्ट कूलिंग प्रकल्पासाठी ठामपाची केलेली निवड या बाबींचा विचार करून राज्य शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने हा सन्मान केल्याची माहिती पालिकेने दिली.

Web Title: Thane Municipal Corporation again tops in energy conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.