ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने

By अजित मांडके | Published: March 14, 2023 04:53 PM2023-03-14T16:53:48+5:302023-03-14T16:54:02+5:30

जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाºयांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता.

Thane Municipal Corporation employees withdraw from strike, only protests | ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संपातून माघार, केवळ निदर्शने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जुन्या पेन्शन योजनेवरून महाराष्ट्रातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मात्र महापालिकेतील कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्याचेच दिसून आले. कर्मचाºयांनी यावेळी केवळ निदर्शने केल्याचे दिसून आले. तसेच यावेळी केवळ आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकूणच महापालिका कर्मचाºयांनी संपातून माघार घेतल्याने पालिकेचा कारभार मात्र सुरळीत सुरु असल्याने ठाणेकरांनी समाधान मानले.  
जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाºयांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता. याच पाशर््वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली होती. यानंतर शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाºया कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारने कर्मचार्यांविरोधात कायद्याचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी होणाºया सरकारी कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. असे असले तरी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाºयांनी आक्र मक होऊन संपाचे हत्यार उपसले आहे.

दरम्यान वर्चस्व असलेल्या ठाणे महापालिकेतील कर्मचाºयांनी मात्र या संपातून काहीशी माघार घेतल्याचे चित्र दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या महापालिकेवर वर्चस्व आहे. त्यामुळेच कदाचित कर्मचाºयांनी माघार घेतल्याची चर्चा सुरु आहे. संपाऐवजी केवळ निदर्शने करून आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती म्युन्सिपल युनियन कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली. संपाची खूप तयारी करावी लागत असल्यामुळे संपाऐवजी केवळ निदर्शने करणार असल्याचे स्पष्टीकरण संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिले.

दुसरीकडे या संपात सहभागी झाले नसले तरी कोणते कर्मचारी गैरहजर आहेत आणि ते कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत का याची माहिती घेण्याचे काम ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू होते.

Web Title: Thane Municipal Corporation employees withdraw from strike, only protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.