ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:01 PM2018-09-11T15:01:48+5:302018-09-11T15:04:26+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे.

Thane Municipal Corporation has given permission for 270 Ganeshotsav Mandals to be installed | ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी

ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशोत्सव मंडळांवर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेचे पथक सज्जउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडपाची उभारणी करण्याचे पालिकेचे आवाहन

ठाणे - यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिका यांनी एकत्रित येऊन ज्या पध्दतीने पावले उचलली. त्यामुळेच यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याच्या परवानग्या मिळाल्या आहेत. त्यातही किचकट बाबी कमी केल्याने कमी दिवसात मंडप उभारणीला परवानगी दिली जात असल्याने गणेशोत्सव मंडळांच्या वेळही वाचला आहे. त्यानुसार पालिकेला प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच उर्वरीत मंडळांनासुध्दा परवानगी दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
              मागील महिन्यात गणेशोत्सव मंडळांच्या आणि पालिका प्रशासन यांच्यात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या मध्यस्तीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनीसुध्दा महत्वाची भुमिका बजावत गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर परवानगी कशा देता येतील यासाठी पावले उचल्याने यंदा ठाण्यात निर्विघ्न गणेशोत्सव साजरा होणार आहे. महापालिकेकडे प्रभाग समिती स्तरावर एकूण ३१५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत मंडळांना मंडप बांधण्यासाठी याच धर्तीवर परवानगी दिली सांयकाळपर्यंत परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान अधिकाऱ्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप बांधताना, मंडप बांधून झाल्यानंतर आणि श्री गणेशाचे आगमन होण्यापूर्वी व श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तपासणी करण्यात यावी असे स्पष्ट करून परिमंडळ उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेले विशेष पथक निर्माण करण्यात आले अहे. या विशेष पथकाद्वारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाची तपासणी करण्याची कार्यवाहीसुध्दा सुरु झाली आहे.
              उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मंडपांची उभारणी करण्यात आली आहे काय, अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा आहे काय, मंडप बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे किंवा नाही या सर्व बाबींची पडताळणी सुध्दा केली जात आहे. त्याचबरोबर गणेशाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाहीसुध्दा पूर्ण झाली आहे.


 

Web Title: Thane Municipal Corporation has given permission for 270 Ganeshotsav Mandals to be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.