गोवरशी लढा देण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये, ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा दिली जाणार गोवरची लस

By अजित मांडके | Published: November 25, 2022 05:06 PM2022-11-25T17:06:47+5:302022-11-25T17:06:59+5:30

गोवरशी लढा देण्यासाठी ठाणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली असून ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा लस दिली जाणार आहे. 

  Thane Municipal Corporation is in action mode to fight measles and children below 5 years of age will be vaccinated again  | गोवरशी लढा देण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये, ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा दिली जाणार गोवरची लस

गोवरशी लढा देण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये, ५ वर्षाच्या आतील मुलांना पुन्हा दिली जाणार गोवरची लस

googlenewsNext

ठाणे : शिळ भागातील एका साडेसहा वर्षीय मुलीचा गोवरने मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. त्या मुलीचे लसीकरणच झाले नसल्याची बाबही आता समोर आली आहे. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी महापालिका आता ॲक्शनमोडमध्ये आली आहे. त्यानुसार १ वर्षाच्या आतील बालकाला ताप आला तरी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आता ५ वर्षाच्या आतील सर्वच बालकांना ज्यांना यापूर्वी गोवरची लस दिली असले त्यांना पुन्हा लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय चार आरोग्य केंद्रात अतिरिक्त अॅम्ब्युलेन्स, घरोघरी जाऊन सव्र्हेक्षण करणो, लक्षणे दिसल्यास तत्काळ अशा रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस गोवरचे रुग्ण वाढत आहेत. त्यात गुरुवारी एका मुलीचा मृत्यु झाल्यानंतर महापालिका आता अधिक सर्तक झाली आहे. त्यानुसार कळवा, मुंब्रा तसेच इतर दोन ठिकाणी अशा चार आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अतिरिक्त अॅम्ब्युलेन्सची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच घरोघरी जाऊन सव्र्हे करण्यावर अधिक भर देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या मुलाला ताप आला असेल आणि तो एक वर्षाच्या आतील असेल तर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तसेच काही बालकांना ताप आणि मुरुम असल्याचे दिसून आल्यास आणि घरचे रुग्णालयात दाखल करण्यास तयार नसतील तरी देखील अशा बालकांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. याशिवाय सव्र्हेचा दुसरा टप्पा ३ नोव्हेंबर र्पयत सुरु राहणार आहे. मात्र गोवरची साथ साधारणपणे फेब्रुवारी अखेरपर्यंत असू शकते, त्यामुळे हा सव्र्हे सुरुच ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण शिबिरांवर भर
याशिवाय लसीकरणावर भर दिला जात आहे, ज्या बालकांचे लसीकरण झाले नसले त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी शिबिरे घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यासाठी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरु यांची मदत घेतली जाणार आहे. पाच वर्षाच्या आतील मुलांचे पुन्हा केले जाणार लसीकरण ठाणे महापालिकेकडे सध्या १९ हजार गोवरचे डोस शिल्लक आहेत. परंतु आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ज्या बालकांचे गोवरचे लसीकरण झालेले असेल अशा पाच वर्षाच्या आतील बालकांना पुन्हा गोवरची लस देण्याची सुचना देण्यात आली आहे. त्यानुसार वाढीव लसींच्या साठय़ाची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. त्या लस पुढील काही दिवसात उपलब्ध होणार आहेत.

बालरोग तज्ञ आणि नर्सेसची संख्या वाढवली
रुग्णांची संख्या शहरात वाढत आहे. परंतु त्यांच्यावर योग्य दर्जाचे उपचार मिळावेत, यासाठी कळवा रुग्णालयात अतिरिक्त बालरोग तज्ञांसह इतर जनरल डॉक्टर आणि नर्सेस व इतर स्टाफ वाढविण्यात आला आहे. महापालिका हद्दीत गोवरचे ५० रुग्ण महापालिका हद्दीत देखील गोवरच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार सद्यस्थितीत गुरुवार र्पयत ही संख्या ५० वर पोहचली असल्याचे दिसून आले आहे. तर एकाचा त्यात मृत्यु झाला आहे. महापालिकेने गोवरशी लढा देण्यासाठी तयारी केलेली आहे. परंतु ठाणेकरांना देखील यात सहभागी होणे गरजेचे आहे. त्यांनी देखील आपल्या बालकांना गोवरची लस दिली आणि तापाची लक्षणो वेळीच ओळखून रुग्णांवर योग्य उपचार करुन घेतले तर निश्चितच गोवरशी लढा देण्यास आपण यशस्वी होऊ, असे ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. 
 

Web Title:   Thane Municipal Corporation is in action mode to fight measles and children below 5 years of age will be vaccinated again 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.