लाचखोर ठामपा लिपिक आणि खासगी इसमास जेरबंद
By अजित मांडके | Published: August 22, 2023 09:56 PM2023-08-22T21:56:15+5:302023-08-22T21:56:39+5:30
त्यानंतर अहिरे याला ही पकडण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास मते करत आहेत.
ठाणे - मुलाचे नाव टॅक्स पावतीवर समाविष्ट करण्यासाठी लाचेची मागणी करत साडेआठ हजार स्वीकारताना ठाणे महापालिका कौसा दिवा उपप्रभाग कार्यालयातील लिपिक गिरीश रतन अहिरे आणि खासगी इसम असीम इनायत शरीफ या दोघा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या मुलाचे नाव टॅक्स पावतीवर समाविष्ट करण्यासाठी ९ हजारांची मागणी ठामपा लिपिक अहिरे याने केली होती. तडजोडीअंती साडेआठ हजार देण्याचे ठरले. ते पैसे अहिरे याच्या सांगण्यावरून शरीफ याला स्वीकारताना रंगेहात एसीबीने पकडले. त्यानंतर अहिरे याला ही पकडण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास मते करत आहेत.