ठाणे महापालिकेचा १० लाख लसीकरणाचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:28 AM2021-09-02T05:28:34+5:302021-09-02T05:28:34+5:30

ठाणे : मागील आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत ठाणे महापालिकेने १० लाख नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा टप्पा पार ...

Thane Municipal Corporation passes 10 lakh vaccination stage | ठाणे महापालिकेचा १० लाख लसीकरणाचा टप्पा पार

ठाणे महापालिकेचा १० लाख लसीकरणाचा टप्पा पार

googlenewsNext

ठाणे : मागील आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत ठाणे महापालिकेने १० लाख नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. ठाणे महापालिकेने आजपर्यंत ४ लाख ७० हजार २८९ महिला व ५ लाख ३० हजार ३२५ पुरूष असा एकूण १० लाख ६१४ उच्चांकी लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी दिली.

ठाणे शहरात आतापर्यंत २४ हजार १९ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर १५,७८२ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी २७,२९० लाभार्थ्यांना पहिला व १३,८७० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटांतर्गत १,८०,११४ लाभार्थ्यांना पहिला तर १,१६,२४० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये १३,७७,६९ लाभार्थ्यांना पहिला डोस व ८२,००५ लाभार्थ्यांना दुसरा डोस, तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये ३,४९,५९८ लाभार्थ्यांना पहिला तर ५३,९२७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील ३९५ गर्भवती महिलांचे, ४३ स्तनदा मातांचे, ४११ तृतीय पंथीयांचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या १७ व्यक्तींचे देखील लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Web Title: Thane Municipal Corporation passes 10 lakh vaccination stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.