Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:52 PM2021-05-29T17:52:55+5:302021-05-29T17:53:24+5:30

ठाण्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असतांना आतापासूनच ठाणो महापालिकेने तिस:या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

Thane Municipal Corporation ready for the third wave of Corona 10 crore worth of medicines | Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी

Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी

Next

ठाण्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असतांना आतापासूनच ठाणो महापालिकेने तिस:या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने या तिस:या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून १० कोटींच्या औषधांची खरेदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामाध्यमातून पालिकेने ३५० प्रकारच्या औषधांची खरेदी केली असून कोरोनाबरोबच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या  आजारांवर ही औषधे उपयुक्त ठरणार आहेत. दुसरीकडे तिसऱ्या लाटेमध्ये  मुलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यानुसार व्हॅन्टीलेटरची खरेदी करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोनाची पहिली लाट थोपवल्यानंतर दुस:या लाटेचा सामना करताना प्रशासनाची पूर्णपणो दमछाक झाली. गेल्या काही दिवसांत रु ग्णसंख्या कमी होतांना दिसत असल्याने काही प्रमाणात का होईना ठाणोकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता यापुढे संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती देखील तज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाने या लाटेचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरु  केली आहे. कोवीडच्या तिस:या लाटेत लहान मुलांना लागण होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्नातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. त्यामुळे पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी १०० बेडचे सेंटर सज्ज करण्यात आले आहे. इथे ५० आयसीयू आणि ५० जनरल बेड असतील. लहान मुलांना वेगळे व्हेंटिलेटर्स लागतात. त्यांची खरेदीसुद्धा पालिकेने केली आहे.  तसेच, संभाव्य कोरोनाग्रस्त मुलांवरील उपचारांसाठी लागणा:या औषधांची माहिती राज्य सरकारच्या टास्क फोर्सने उपलब्ध करून दिली आहे. त्या औषधांची खरेदी करण्याची प्रक्रि याही पालिकेने सुरू केली आहे. तिसरी लाट व पावसाळ्यातील रोगराईचा मुकाबला करण्यासाठी ३५० प्रकारची  सुमारे १० कोटी रु पये किमतीची औषधखरेदी पालिकेने केली आहे. तसेच, ४ कोटी रु पये किमतीची सर्जीकल सामग्रीसुद्धा खरेदी करण्यात आली आहे.  

ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ग्लोबल, पार्कीग प्लाझा, कौसा व खारीगाव येथील कोविड सेंटर्स कार्यरत होती. आता व्होल्टास आणि बुश कंपनी येथील कोविड सेंटर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. तिस:या लाटेचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने ग्लोबल व पार्कीग प्लाझा कोविड सेंटरपाठोपाठ व्होल्टास येथील केंद्रावरही ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लाण्ट उभारला आहे. कोवीड सेंटर्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, लहान मुलांसाठी १०० बेडचे कोविड सेंटर, पुढील चार महिने पुरतील एवढा औषध साठा, सर्जीकल उपकरणो, रेमडेसिवीर अशी, सर्वच आघाड्यांवरील अत्यावश्यक सामग्री पालिकेने खरेदी केल्याची माहिती ठाणो महापालिकेने दिली आहे. त्यानुसार येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी केल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Thane Municipal Corporation ready for the third wave of Corona 10 crore worth of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.