ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 06:47 AM2017-11-29T06:47:10+5:302017-11-29T06:47:14+5:30

उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 Thane Municipal Corporation: Recovery from Garbage Dues from 1 st December | ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली

ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली

googlenewsNext

ठाणे : उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे असे काही कृत्य करीत असाल तर तुम्ही दंड भरण्यासाठीही तयार राहा असा इशाराच पालिकेने दिला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सफाई मार्शल दंड वसूल करण्यासाठी शहरभर फिरणार आहेत.
शहर अस्वच्छ करणाºया नागरिकांना दंड आकारून चाप बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या संदर्भात २०१२ मध्ये उपविधीसुद्धा तयार केली होती. तिला अखेर शासनाने मंजुरीदिली आहे. आता शहर अस्वछ करणाºया व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाºया दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. शहरात दररोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून तो गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० घंटागाड्या आहेत. पाच वर्षापूर्वी शहरात ५०० पेक्षा अधिक कचरा टाकण्याची ठिकाणे होती. हे प्रमाण १५० वर आले असले तरी उघड्यावर कचरा टाकणाºयांची संख्या मात्र कमी झालेली नाही. केवळ उघड्यावर कचरा टाकणे इथपर्यंत हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, मुत्र विसर्जन करणे, इमारतीची मलावाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचºयाचे विभक्तीकरण करणे अशा अनेक गोष्टींचे पालन न करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने उपविधी तयार केली असून या उपविधीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता १० रुपयांपासून थेट २० हजारापर्यंत दंड आकारला जाणार आहे. यासाठी आता २४५ सफाई मार्शलच्या नेमणुकीची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून त्याचा प्रस्तावदेखील नुकत्याच झालेल्या महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभाग समितीत साधारणपणे प्रत्येकी २५ या प्रमाणे, हे मार्शल १ डिसेंबरपासून वॉच ठेवणार आहेत.
आॅन ड्युटी २४ तास या प्रमाणे ते काम करणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे.

अशी आहे दंडाची रक्कम

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणे १००, मुत्र विसर्जन १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेने शौचास बसने १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वस्छ परिसर आणि आवार १०,०००, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाईन मधील सांडपाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सुचना दिल्यानंतरही १० दिवसात दुरु स्ती न केल्यास १०,००० रु पयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title:  Thane Municipal Corporation: Recovery from Garbage Dues from 1 st December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.