ठाणे महापालिका कामगारांना हवाय 20 हजार बोनस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 08:32 PM2017-09-27T20:32:31+5:302017-09-27T20:32:48+5:30
येत्या काही दिवसांवर आता दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणो महापालिकेत सानुग्रह अनुदानाबाबत आता चर्चेला सुरवात झाली आहे.
ठाणे - येत्या काही दिवसांवर आता दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणो महापालिकेत सानुग्रह अनुदानाबाबत आता चर्चेला सुरवात झाली आहे. पालिकेत कार्यरत असलेल्या युनियन वाल्यांनी देखील कर्मचा:यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून मागणी केली आहे. त्यामुळे आता यंदा पालिका कर्मचा:यांना किती बोनस मिळणार हे आता येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. परंतु यावर तत्काळ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा म्युनिसिपल लेबर युनियनने दिला आहे.
दरवर्षी ठाणो महापालिकेच्या कर्मचा:यांना सानुग्रह अनुदान किती मिळावे, यावर चांगलेच खलबते सुरु असतात. मागील वर्षी तर सानुग्रह अनुदानाचा निर्णय थेट महासभेत घेण्यात आला होता. त्यामुळे हे अनुदान मिळावे म्हणून युनियनने केलेल्या मागणीचा बार फुसका देखील ठरला होता. त्यात आता पुन्हा येत्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या निमित्ताने सानुग्रह अनुदानाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कर्मचा:यांना दिवाळी आधीच 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी केली आहे. परंतु या मागणी बाबत प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मागील वर्षी पालिका कर्मचा:यांना 12750 रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा आता पालिका कीती देणार याबाबत आता लवकरच दिशा ठरविली जाईल अशी माहिती पालिकेने दिली.