ठाणे महापालिकेचा ३०० कोटींचा ठेवा!

By admin | Published: January 18, 2016 02:06 AM2016-01-18T02:06:29+5:302016-01-18T02:06:29+5:30

मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेचा आर्थिक डोलारा हा पुरता कोलमडलेला होता. ठेकेदारांच्या बिलांसह कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर निघतील अथवा नाही

Thane Municipal Corporation will keep 300 crores! | ठाणे महापालिकेचा ३०० कोटींचा ठेवा!

ठाणे महापालिकेचा ३०० कोटींचा ठेवा!

Next

ठाणे : मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिकेचा आर्थिक डोलारा हा पुरता कोलमडलेला होता. ठेकेदारांच्या बिलांसह कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर निघतील अथवा नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत अतिरिक्त ३०० कोटींचे उत्पन्न मिळवून शिल्लक असलेल्या एलबीटीसह नगरविकास विभागाकडून आलेल्या घसघशीत महसुलाच्या बळावर ठाणे महापालिका प्रशासनाने दिवाळखोरीला बाजूला सारून आपली अर्थव्यवस्था भक्कम केली आहे. तसेच आता ही रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेवली आहे.
ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून रु जू झाल्यानंतर संजीव जयस्वाल यांनी उत्पन्नवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच आता उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसत आहे. आता या वाढलेल्या महसुलाच्या जोरावर महापालिकेने आपली आर्थिक गणिते जमवितानाच ३०० कोटी रु पये मुदत ठेव म्हणून बँकेत ठेवले आहेत. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना जकातीला पर्याय म्हणून राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी केली. सत्ताबदल होताच युती सरकारने ही कर पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांचे एलबीटीचे उत्पन्न सरासरी ६०० कोटी रु पये होते. एलबीटी बंद झाल्याने महापालिकांचे जमाखर्चाचे गणित कोलमडले होते. त्याला पर्याय म्हणून शहरात नोंदणी होणाऱ्या मालमत्तेच्या नोंदणीचा एक टक्का देण्याबरोबरच एलबीटी उत्पन्नाच्या काही प्रमाणात अनुदानही देण्याचे ठरविले. परंतु, त्यानंतरही अनेक महापालिकांना जमाखर्चाचे गणित जमविणे शक्य झाले नाही. अशीच अवस्था ठाणे महापालिकेची एक वर्षभरापूर्वी होती. तिजोरीत खडखडात असल्यामुळे शहरातील विकासकामेही खोळंबली होती.

Web Title: Thane Municipal Corporation will keep 300 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.