ठाणे महापालिकेची वागळे भागात ३५० बांधकामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 03:56 PM2019-01-07T15:56:15+5:302019-01-07T15:58:38+5:30

ठाणे महापालिकेने सोमवारी सकाळी वागळे इस्टेट भागात आपला मोर्चा वळविला होता. त्यानुसार कामगार रुग्णालय ते ज्ञानेश्वरनगर पर्यंतच्या ३५० बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. यामध्ये २५० व्यावसायिक १०० निवासी बांधकामांचा समावेश आहे.

Thane Municipal Corporation's action on 350 construction works in Wagle | ठाणे महापालिकेची वागळे भागात ३५० बांधकामांवर कारवाई

ठाणे महापालिकेची वागळे भागात ३५० बांधकामांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे१०० निवासी बांधकामधारकांचे रेंटलच्या घरात पुनर्वसनव्यावासायिक बाधीतांचे बाजूलाच केले जाणार पुनर्वसन

ठाणे - घोडंबदर भागातील बांधकामांवर कारवाई केल्यानंतर सोमवारी ठाणे महापालिकेने आपला मोर्चा वागळे इस्टेट भागात वळविला. यावेळी या भागातील कामगार रुग्णालय नाका ते ज्ञानेश्वारनगर पर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे येथील २४ मीटरचा रस्ता आता ३० मीटर होणार आहे.
             ठाणे महापालिकेच्या वतीने नवीन वर्षात पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार घोडबंदर भागात १२७ बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर सोमवारी महापालिकेने वागळे पट्यात रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली. बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेची पथके वागळे इस्टेटमधील कामगार नाक्यावर सकाळी पोहचली. या पथकांनी बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू करताच अनेकांनी दुकानांमधील साहित्य इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. काही जणांनी कामगार रु ग्णालय वसाहतीच्या आवारातील मोकळ्या जागेत साहित्य नेऊन ठेवले. साहित्याची वाहतूक करताना अनेकांची दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर कामगार रु ग्णालय नाका ते ज्ञानेश्वारनगरपर्यंतच्या मार्गावरील ३५० बांधकामे पथकाने जमीनदोस्त केली. त्यामध्ये २५० व्यावसायिक बांधकामे तर १०० निवासी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने ही बांधकामे तोडण्यात आली. आयुक्त जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या पाश्र्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारवाई पाहण्यासाठी परिसरात अनेकांनी मोठी गर्दी केली होती. कामगार रु ग्णालय भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी येथील रस्ता ३० मीटर रु ंद करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी येथील बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला. ३० मीटर रस्ता रुंद केल्यानंतर त्या लगतच २५० व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातही कोणाचे पुनर्वसन राहिले तर त्याचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले जाईल अशी हमी यावेळी पालिकेने दिली. तसेच १०० निवासी बांधकामांतील कुटूंबांचे भाडे तत्वावरील योजनेच्या घरांमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले असून त्यांना बीएसयुपीची घरे दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.


 

Web Title: Thane Municipal Corporation's action on 350 construction works in Wagle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.