ठाणे महापालिकेचा कनटेंमेट प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:01 PM2020-05-06T18:01:08+5:302020-05-06T18:02:03+5:30
ठाणे महापालिकेने आता कंटेनेमेंट प्लॅन तयार केला आहे. त्या अनुषंगाने रोज किती रुग्ण दाखल होतात, किती रुग्ण बरे होतोत, किती रुग्णांचा मृत्यु होतो, त्यानुसार प्रभाग समितीनिहाय हा प्लॅन अॅटीव्ह केला जात आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असेल त्या प्रभाग समितीमधील अॅटीव्ह झोनची संख्याही कमी होत आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी कनटेंमेट प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीमधून रोज किती रुग्णांना कोरोनाची लागण झाली, किती बरे झाले, किती जणांचा मृत्यु झाला, १४ दिवसांचा कालावधी कीती जणांनी पूर्ण केला याची सर्व खबरदारी पालिकेकडून घेतली जात आहे. त्यानुसार रुग्णांची संख्या कमी झाली तर त्या प्रभाग समितीमधील काही भाग हे अॅक्टीव्ह झोन म्हणून कार्यरर्त केले जात आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहे. त्या अनुषंगाने आता कनटेंमेट प्लॅनही तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेच्या विविध उपाय योजना केल्या जात आहे. तसेच आता या प्लॅन नुसार रोजच्या रोज विविध प्रभाग समितीमध्ये कामे केली जात आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीमध्ये कोणत्या भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. कोणत्या भागात रुग्णांची संख्या कमी आहे, त्यानुसार रोजच्या रोज या प्लॅनमध्ये बदल केले जात आहेत. त्यानुसार आता शहरात आजच्या घडीला ४४९ च्या आसपास कोरोना बाधीत रुग्ण आहेत. त्यातील १८ रुग्णांचा मृत्यु आतापर्यंत झालेला आहे. यामध्ये लोकमान्य सावरकर नगर आणि मुंब्य्रात प्रत्येकी ५ जणांचा मृत्यु झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९४ एवढी झाली आहे. यामध्येही कळवा प्रभाग समितीत आतापर्यंत १९ रुग्ण बरे झाले आहेत, तर मुंब्य्रात १४, नौपाडा १६, लोकमान्य सावरकर १५ आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रत्यक्षात ३३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तर या प्रभाग समितीमध्ये १७२ कनटेंमेंट झोन असून त्यातील १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले ५८ झोन आहेत. त्यामुळे ही संख्या ११४ वर आली आहे.
प्रभाग समिती पॉझीटीव्ह रुग्ण डिर्साच्ज मृत्यु
उथळसर ३९ ६ २
माजिवडा -मानपाडा २८ १२ १
वर्तकनगर ३४ ९ १
लोकमान्य,सावरकर ९४ १५ ५
वागळे ८० १ ३
नौपाडा, कोपरी ४८ १६ १
कळवा ४३ १९ ०
मुंब्रा ६२ १४ ५
दिवा २१ २ ०
--------------------------------------------------------------------
एकूण ४४९ ९४ १८